कराड नगरपालिकेच्या कामानिमित्त मी दिल्लीत : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या संदर्भात मी दिल्लीत आलेलो नाही. माझ्या कराड नगरपालिकेच्या काही कामानिमित्त आलेलो असल्याचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. दिल्ली येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

नवाब मलिक यांच्यावरील कारवाई संदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा पत्रकारांनी दिल्लीत विधानसेभच्या अध्यक्ष पदाबाबत काही चर्चा झाली का असे विचारताच. आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी सध्या दिल्लीत कराड येथील काही कामाबाबत आलो आहे. शहरातील नगरपालिकेच्या काही कामे आहेत, त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मी दिल्लीत आलो आहे.

कराड नगरपालिकेची काही दिवसात निवडणूक आलेली असताना, आ. पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीत शहरातील कामासाठी गेलेले आहेत. त्यामुळे काॅंग्रेस पक्षाकडून तसेच पृथ्वीराज चव्हाण गटाकडून नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे दिसून आले.