बेभान झालेल्या गव्यासमोर अचानक आली महिला आणि…. कोल्हापूरमधील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये सध्या गव्यांनी थैमान (gaur attack) घातले आहे. मागच्या सहा महिन्यांपूर्वी गव्याच्या हल्ल्यात (gaur attack) एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असताना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एका महिलेचा गव्याच्या हल्ल्यात (gaur attack) जीव गेला असता. आजऱ्यातील भावेवाडीत ही घटना घडली आहे. गावात गवा शिरल्याने गावकरी चांगलेच हैराण झाले आहेत.

या सगळ्यामुळे सैरभैर झालेल्या या गव्याच्या हल्ल्यातून (gaur attack) सुदैवाने एक महिला बचावली आहे. त्याचे झाले असे कि, गुरुवारी दुपारच्या दरम्यान एक गवा भावेवाडी गावामध्ये शिरला. हा गवा आल्याची चाहूल लागताच कुत्र्यांनी त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. यानंतर ग्रामस्थांनीदेखील त्याला हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न केले.

या सर्व प्रकारात रस्त्यावरून चाललेल्या एका महिलेसमोर हा गवा आल्याने गवा थेट त्या महिलेच्या अंगावर (gaur attack) गेला असता मात्र या महिलेची आणि गव्याची धडक होता होता राहिली. या महिलेने गावकऱ्यांचा व कुत्र्यांचा गोंधळ ऐकून तिकडून पळ काढला. हि महिला तातडीने तिकडून बाजूला झाल्याने तिचा थोडक्यात जीव वाचला आहे. या भागात कालपासून गव्याने धुमाकूळ घातला आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती