नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या देशातील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवत आहे. मागील २४ तासांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ नोंद झाली आहे. गुरूवारी दिवसभरात १३ हजार ५८६ नवे रुग्ण आढळले.
पहिल्यांदाच नव्या रुग्णांची संख्या एका दिवसात १३ हजारहून अधिक संख्या पाहायला मिळाली आहे. देशभरात एकूण रुग्णांची संख्या ३ लाख ८० हजार ५३२ झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्येही मागील २४ तासांमध्ये ३३६ ने भर पडली आहे. देसाहत आतापर्यंत कोरोनाने एकूण १२ हजार ५७३ मृत्यू झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.९६ टक्के आहे. एकूण दोन लाख ४ हजार ७११ रुग्ण बरे झाले असून १ लाख ६३ हजार २४८ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मागील २४ तासांमध्ये १ लाख ६५ हजार ४१२ नमुना चाचण्या घेण्यात आल्या व ७.७८ टक्के रुग्णांची कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत ६२ लाख ४९ हजार ६६८ नमुना चाचण्या झाल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”