सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर : 24 तासांत 1 हजार 395 पाॅझिटीव्ह

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा विस्फोट निर्माण करणारे येत आहेत, कोरोना बाधितांची दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. तर दुसरीकडे बाधितांच्या आजपर्यंत मृत्यू पावलेल्याची संख्या दोन हजारांच्या पार झाली असून काल दिवसभरात मृत्यूचा आकडा वाढल्याने स्मशानभूमी कमी पडली होती. एकदंर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर झाली आहे. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांचा टप्पा पार करून 11 हजार 360 झाली आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 395 जण कोरोनाबाधित  आले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 78 हजार 919 आहे. तर जिल्ह्यात एकूण 64,921 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. सध्या जिल्ह्यात 11 हजार 360 उपचारार्थ दाखल रुग्ण आहेत. तर चोवीस तासांत 23 लोकांचा मृत्यू झाल्याची माहीती समजत आहे.

कोरोना बाधितांची वाढणारी संख्या जिल्ह्यासाठी चिंताजनक बनत आहे. संचारबंदी सुरू होणार असल्याने काही दुकाने बंद दिसत आहेत. मात्र रस्त्यांवर लोकांची गर्दीचे चित्र पहायला मिळत आहे. लोक रस्त्यांवर येत असले तरी पोलिस प्रशासनाकडून शहरात येणाऱ्या मुख्य ठिकाणी चेकिंग केले जात आहे. तसेच अनावश्यक कारणांसाठी येणाऱ्या लोकांच्यावर कारवाई केली जात आहे. जिल्ह्यात रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे बेड शिल्लकीचे प्रमाण कमी असून जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडू लागला आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like