साताऱ्यात शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मशाली पेटविल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी रीघ लावली. साताऱ्यात शिवसैनिकांनी मशाली पेटवून गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्याची शपथ घेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिकांनी मशाली पेटविल्या.

छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अमर रहे, जय भवानी, जय शिवाजी, उद्धव ठाकरे तुम आगे बढो, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच यापुढे शिसेनेसोबत जे घडेल त्याला त्याच पद्धतीने प्रत्त्युतर देऊन गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्याची शपथ शिवसैनिकांनी घेतली. यावेळी माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील, सातारा शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, अमोल आवळे यांच्यासह शिवसैनिक, महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. शिवसेनेने मराठी माणसाला ताठ मानेने जगण्याचा मंत्र दिला, असे म्हणत बाळासाहेबांना नरेंद्र पाटील यांनी मानवंदना दिली. शिसेनेसोबत जे घडेल त्याला त्याच पद्धतीने प्रत्त्युतर देऊन गद्दारांना त्यांची जागा दाखवून देणार असे गणेश अहिवळे यांनी सांगितले.

साताऱ्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त पोवई नाक्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात जमलेल्या शिवसैनिकांनी 100 हुन अधिक पेटत्या मशाली हातात घेऊन उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ देण्याचा निर्धार केला. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक शिवतीर्थावर एकत्र आले होते. भविष्यात शिवसेनेच्या वाटेला कोण गेल्यास शिवसेनेचा वाघ विरोधकांच्या छाताडावर बसून त्याच नारड फोडल्याशिवाय राहणार नाही असे सांगत शिंदे गटाला इशारा दिला आहे.