Mahindra च्या या SUV’s कारसाठी 2.60 लाख लोकांनी केले अ‍ॅडव्हान्स बुकिंग; जाणून घ्या गाडीची खासियत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – महिंद्राची (Mahindra) देशातील आघाडीची स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल उत्पादक करणारी कंपनी म्हणून ओळख आहे. कंपनी या विभागातील अनेक वाहनांची विक्री करते. गेल्या काही महिन्यांत, महिंद्राने आपल्या नवीन Scorpio-N पासून XUV700 पर्यंत अनेक नवीन मॉडेल बाजारात आणले. यानंतर महिंद्रा कंपनीने अ‍ॅडव्हान्स फीचर्स आणि मस्क्युलर लुक असणारी नवी एसयूव्ही कार बाजारात आणली. ह्या गाडीची लोकांमध्ये एवढी क्रेज झाली कि 2.60 लाख लोकांनी लोकांनी या गाडीचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग केले. आता ग्राहक हि गाडी मिळण्याची प्रतीक्षा करत आहे.

1 नोव्हेंबरपर्यंत, महिंद्राने (Mahindra) एकूण 2,60,000 वाहन बुकिंगची नोंदणी केली होती. यामध्ये Scorpio-N, Scorpio Classic, XUV700, Thar, आणि XUV300 यांचा समावेश आहे. तथापि, बुकिंगचा आकडा मॉडेलनुसार बदलतो. सर्वाधिक मागणी असलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ रेंजमध्ये अनुक्रमे 1,30,000 लोकांनी , XUV700 साठी 80,000 लोकांनी , थारसाठी 20,000 लोकांनी आणि थार तसेच बोलेरोसाठी 13,000 लोकांनी बुकिंग केले आहे. तसेच XUV700 साठी 11,000 लोकांनी, थारसाठी 4,900 लोकांनी, XUV300 साठी 6,400 लोकांनी, बोलेरो आणि बोलेरा निओसाठी 8,300 लोकांनी तिमाहीत सरासरी मासिक बुकिंग नोंदवली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात कंपनीने आतापर्यंत सर्वाधिक 53,000 वाहनांचे बुकिंग केले आहे.

स्कॉर्पिओ ही कंपनीने ऑफर केलेल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हींपैकी एक आहे. ही एसयूव्ही अनेक दशकांपासून चमकदार कामगिरी करत आहे, त्याच कंपनीने आपले पुढचे मॉडेल लॉन्च केले आहे. एकूण चार प्रकारांमध्ये (Z2, Z4, Z6 आणि Z8) हे मॉडेल लॉंच करण्यात आले आहे. या SUV ची किंमत 11.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ऑन रोड ती 23.90 लाख रुपये पर्यंत जाते.

काय आहे गाडीची खासियत
नवीन महिंद्रा (Mahindra) स्कॉर्पिओमध्ये, कंपनीने 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, फ्रंट आणि रिअर कॅमेरे, एक वायरलेस फोन चार्जर, सहा-वे पॉवर ड्रायव्हर सीट, सनरूफ आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट दिले आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने, SUV ला अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), 6 एअरबॅग्ज, हिल-असिस्ट कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) सह इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC) हे फीचर्स या गाडीमध्ये आहेत.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी