चेन्नई । भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील पूर्व लडाखमधील सीमावादामुळं असलेला तणाव अद्यापही पूर्णपणे निवळला नाही. वरिष्ठ पातळीवरील लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा झाली असली तरी त्यातून समाधानकारक यश अजून भारताला मिळालेलं नाही आहे. एप्रिलमध्ये सीमेवरील ‘जैसे थे परिस्थिती’ पूर्ववत करण्यावर भारताचा भर आहे. दरम्यान पूर्व लडाखमधील काही भागातून माघार घेतली असली तरी चीननं आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. अशातच अंदमान-निकोबार बेटानजीक नौदलानं केलेल्या कवायतींमधून चीनला एक कठोर संदेश देण्याचं काम केलं आहे.
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार भारतीय युद्धनौका अंदमान निकोबार बेटांजवळ कवायती करत आहेत. यामध्ये युद्धनौका, लढाऊ विमानं आणि पाणबुड्यांचा समावेश आहे. “काही युद्धनौका ज्या मल्लकाकडे तैनात केल्या आहेत त्यादेखील या कवायतींमध्ये सामिल झाल्या आहेत,” अशी माहिती या ड्रीलचे नेतृत्व करणारे इस्टर्न नेव्हल कमांडचे चीफ रेअर एडमिरल संजय वात्सायन यांनी सांगितलं.मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये पाणबुड्यांचा शोध घेणारे विमान Poseidon-8I, ज्यामध्ये हारपून ब्लाॉक मिसाईल आहे, MK-54 लाईटवेट टोरपॅडो हेदेखील या ड्रीलचा प्रमुख भाग आहे. गेल्या महिन्यात मलक्कामध्ये भारत आणि जापाननंही एकत्रित कवायती केल्या होत्या. परंतु त्या मर्यादित स्वरूपाच्या होत्या.
अंदमान निकोबार बेटांजवळील भारतीय नौदलाच्या या कवायती महत्त्वपूर्ण मानल्या जात आहे. चीनचे काही समुद्री मार्ग याच भागातून जातात. तसंच या मार्गावरूनही चीनचा व्यापार होतो. चीनसाठी या कवायती दुहेरी हल्ल्याप्रमाणे आहेत. यापूर्वी दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेची २ लढाऊ जहाजांनीदेखील कवायती केल्या आहेत. परंतु त्यावेळी चीनकडे केवळ पाहत राहण्याशिवाय पर्याय नव्हता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”