फुफ्फुसांवर अतिशय वाईट परिणाम करतो आहे कोरोना, बरे झाल्यावर रुग्णांना होतोय त्रास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात वाढणाऱ्या कोरोना विषाणूच्या अनेक स्थिती समोर येत आहेत यामध्ये फुफ्फुसांच्या काही स्थिती समोर आल्या आहेत ज्यामध्ये फुफ्फुसांचे फायब्रॉसिसचा समावेश आहे. यासोबत पल्मनरी आर्टरी मध्ये रक्ताचे थक्के जमत आहेत. अत्यवस्थ असूनही बरे झालेल्या रुग्णांमध्ये या स्थिती अधिक आढळून येत आहेत. जगभरातील प्लमोनोलॉजिस्ट या प्रकारच्या समस्यांना सामोरे जात आहेत कारण कोरोना तुन बरे झालेल्या अशा रुग्णांना श्वासासंदर्भात समस्यांना सामोरे जावे लागते आहे. असे रुग्ण बरे होत आहेत पण खूप काळापर्यंत त्यांना फुफ्फुसाच्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे.

काही प्रकरणांमध्ये बरे झाल्यावर डिस्चार्ज घेऊन घरी गेलेल्या रुग्णांना ऑक्सिजन ची आवश्यकता भासते आहे. तर काहींच्या हृदयावरही परिणाम होतो आहे. हैद्राबादमधील वरिष्ठ प्लमोनोलॉजिस्ट डॉ ए रघु यांनी नुकतेच कोरोना रुग्णांच्या फुफ्फुसांवर हल्ला करतो आणि यावेळी ऑक्सिजन अवशोषण करण्याची क्षमता मर्यादित होऊन जाते असे समोर आल्याचे सांगितले आहे. ज्याचा परिणाम म्हणजे खोकला आणि श्वास घेण्यात त्रास होतो आहे. तर काही डॉक्टरांचे म्हणणे आहे की बरे झालेल्या रुग्णांना हा त्रास सहन करावा लागत असला तरी रुग्णांना फायब्रोसिस होतो की नाही हे ठरविणे कठीण आहे.

काही रुग्णांना उपचारदरम्यान अँटी फायब्रॉटिक औषधे दिली जातात, आणि दोन महिन्यांनी तपासणी करण्यास सांगितले जाते. त्यांना फायब्रॉसिस चा त्रास होतो आहे पण किती प्रमाणात होतो आहे याचे आकलन करता येत नसल्याचे काही डॉक्टरांनी म्हंटले आहे. याबरोबर पल्मनरी थ्रोम्बो एम्बोलिज्म ही देखील समस्या समोर येते आहे. यामुळे पल्मनरी धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन फुफ्फुसांच्या माध्यमातून रक्तप्रवाह रोखला जातो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment