हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या देशामध्ये कोरोनाने पाय पसरायला सुरूवात केली आहे. गेल्या 24 तासात देशात 412 रूग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती बुधवारी आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे. यामध्ये जेएन.1 या अत्यंत घातक असणाऱ्या व्हेरिएंटच्या रुग्णात देखील वाढ होत चालली असल्यामुळे प्रशासनाने नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
बुधवारी आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली की, देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजार 170 वर पोहचली आहे. यामध्ये जेएन. 1 व्हेरिएंटचे 69 रुग्ण आहेत. आतापर्यंत सात राज्यात जेएन.1 व्हेरिएंटचे रूग्ण आढळून आले आहेत. यात कर्नाटक आणि केरळ राज्यामध्ये कोरणा विषाणूचा वेगाने फैलाव होत आहे. गेल्या 24 तासात केरळ राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण सापडले आहेत.
गुजरातमध्ये 34 रूग्ण आढळले
जेएन.1 चे गुजरातमध्ये 34 रूग्ण आढळून आले आहेत. याबरोबरीने गोव्यात 18 रूग्ण, कर्नाटकमध्ये 8 रुग्ण, महाराष्ट्रात 7 रुग्ण, राजस्थानमध्ये 5, तामिळनाडूमध्ये 4 तेलंगणामध्ये 1 आणि व्हेरिएंटचे दोन रूग्ण सापडले आहेत. केरळ राज्यात 8 डिसेंबर रोजी व्हेरिएंटचा पहिला रुग्ण सापडला होता. तसेच परदेशात म्हणजेच फ्रान्स, अमेरिका, सिंगापूर, कॅनडा, ब्रिटन, स्वीडन देशात जेएन.1 व्हेरिएंटचे सर्वाधिक रूग्ण आहेत.