राज्यात आत्तापर्यंत ९३ हजार कोरोनाबाधित झाले बरे- राजेश टोपे

0
39
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात आत्तापर्यंत ९३ हजार कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून तसंच प्लाझ्मा थेरपीमुळेही अनेक लोक बरे होत आहेत. प्लाझ्मा थेरेपी महाराष्ट्रात यशस्वी ठरते आहे. १० पैकी ९ रुग्णांना या थेरेपीमुळे फरक पडतोय अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. एवढंच नाही तर Remdesivir आणि Favipiravir ही दोन्ही औषधं येत्या २ दिवसात सगळ्या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होतील अशीही माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात प्लाझ्मा थेरपी वाढवण्याचे ठरवले आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र सुरु करत आहोत. कोरोनाला रोखण्यासाठी ही थेरपी उपयुक्त ठरत आहे. १० पैकी ९ रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा फायदा होत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्रही सुरु करत आहोत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

रुग्णवाहिका चालकांनी अवाजवी दर घेतल्यास परवाना रद्द
रुग्णवाहिकांबाबत मुंबईच नव्हे तर राज्यभरातून तक्रारी येत होत्या. अर्धा किलोमीटरसाठी 5 ते 8 हजार रुपये आकारले जातात. त्यामुळे खाजगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर खाजगी रुग्णवाहिकांनी प्रति किलोमीटर किती दर आकारायच्या त्याचा निर्णय त्या जिल्ह्यातील आरटीओ घेतील. त्यापेक्षा जास्त दर घेतला तर परवाना रद्द करण्याबरोबर गुन्हा दाखल केला जाईल. ठरवलेल्या दरापेक्षा जास्त दर लावला तर लोक जिल्ह्याच्या हेल्पलाईनवर तक्रार करू शकतात, असं टोपे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here