खा. श्रीनिवास पाटील यांच्या विजयात जिल्ह्यात तांबवे- सुपने गटाचे मताधिक्य 1 नंबर : सारंगबाबा पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्ह्यात सर्वात जादा मताधिक्य तांबवे- सुपने जिल्हा परिषद गटाने खासदार श्रीनिवास पाटील यांना दिले. तुमच्या मतांचा आदर राखत दोन वर्ष कोरोना काळात गेल्यानंतरही खासदार साहेबांनी विकास कामांचा बॅकलाॅग भरून काढला आहे. आज सातारा जिल्ह्यात दररोज किमान 3 ते 4 विकास कामांचा शुभारंभ, भूमिपूजन होत आहेत. त्यामुळे खासदार साहेबांच्या माध्यमातून विकास कामांचा डोंगर उभा राहत आहे. केवळ गट- तट बाजूला ठेवून विकास कामाला प्राधान्य देणाऱ्या तुमच्या मतदारांमुळे सर्व शक्य होत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य माहिती तंत्रज्ञान सेलचे अध्यक्ष सारंग बाबा पाटील यांनी केले.

तांबवे (ता. कराड) येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामाचा शुभारंभ प्रसंगी सारंग पाटील बोलत होते. तांबवे येथील गांधी चौक ते जोतिबा मंदिर रस्ता कॉंक्रिटीकरण तसेच तांबजाई चौक ते दत्तात्रय धोंडजी पाटील (आबा) यांच्या घरापर्यंत बंदिस्त गटार कामाचा शुभारंभ होणार आहे. तसेच स्वर्गीय पी. डी. पाटील (दाजी) वस्ती रस्ता खडीकरण व कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य व रयत कारखान्यांचे संचालक प्रदीप पाटील, सरपंच शोभाताई शिंदे, उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील, जेष्ठ नेते निवासराव पाटील, माजी उपसरपंच धनंजय ताटे, दिलीपदादा पाटील, उत्तर तांबवेचे सरपंच जयसिंग पाटील, माजी जि. प. सदस्य रघुनंदन बागवडे, युवा नेते सुहास गायकवाड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, शंकरराव पाटील, ग्रा. प. सदस्य देवानंद राऊत, उत्तम साठे, अमरनाथ गुरव, सौ. जयश्री कबाडे, सौ. निता पवार, सौ. रेश्मा वाडते, सौ. सुनंदा कुभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड. विजयसिंह पाटील यांनी प्रास्ताविकात म्हणाले, खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांचे नेहमीच तांबवे गावासह परिसरावर विशेष लक्ष असते. आज एका दिवसात 30 लाखांच्या 5 कामांचे डेळेवाडी व तांबवे याठिकाणी केले. आता यापुढील काळात कोयना नदीकाठी पूर संरक्षक भिंत आम्हांला विशेष बाब म्हणून मिळावी, यासाठी सारंग बाबांनी लक्ष द्यावे. यावेळी सरपंच शोभाताई शिंदे यांनी स्वागत केले. आभार धनंजय ताटे यांनी मानले.