सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरातील शाहूनगरमध्ये गुरुकुल शाळेमार्फत 6 ठिकाणी निर्भया पथकाचे बोर्ड लावण्यात आलेली आहेत. महिलांना कुठेही संरक्षणाची गरज भासल्यास किंवा कोणतीही अडचण आल्यास त्यांनी 100 व 1091 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक आंचल दलाल यांनी केले आहे.
सातारा शहरात गुरूकुल शाळेकडून शहरात लावण्यात आलेल्या बोर्डचे उद्घाटन श्रीमती आंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पोलीस दादा आणि पोलीस दीदी यांच्यामार्फत गुड टच बॅड टच याचे मार्गदर्शन विद्यार्थी आणि पालकांना करण्यात आले.
राजेंद्र चोरगे म्हणाले, महिलांच्या सुरक्षितेसाठी या बोर्डचा मोठा फायदा होणार आहे. शहरात महिलांना कोणताही त्रास होत असल्यास या बोर्डवरती हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत, त्यावरती फोन करून मदत मागता येणार आहे. तसेच विद्यार्थींना गुड टच आणि बॅड टच याचेही मार्गदर्शन करण्यात आले. मुलींच्या सुरक्षितेसाठी हे कळणे अत्यंत गरजेचे आहे.