आता शेतीत डिझेलचा वापर होणार नाही; सरकारने तयार केला ‘हा’ प्लॅन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । डिझेलचा वापर बंद करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 2024 पर्यंत शेतावरील डिझेलचा वापर शून्यावर आणण्याची आणि कृषी क्षेत्राला रिन्यूएबल एनर्जीमध्ये रूपांतरित करण्याची भारताची अपेक्षा आहे. भारतातून येत्या दोन वर्षांत कृषी क्षेत्रात डिझेलचा वापर जवळपास संपुष्टात येईल, असे केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के.सिंग यांनी म्हटले आहे.

शेतीमध्ये डिझेलऐवजी जीवाश्म इंधनाचा वापर रिन्यूएबल एनर्जीसह केला जाईल. उर्जा मंत्रालय आणि रिन्यूएबल एनर्जी मंत्रालयाच्या अधिकार्‍यांसह, ऊर्जा कार्यक्षमतेच्या उपायांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सहकार्याच्या गरजेवर ऊर्जा मंत्र्यांनी भर दिला.

ते म्हणाले की,”केंद्र सरकार नवीन आणि आधुनिक भारतासाठी काम करत आहे, जे आधुनिक वीज व्यवस्थेशिवाय होऊ शकत नाही. आणि त्यासाठी ते आधुनिक भारतासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत काम करण्यास तयार आहे.” ते असेही म्हणाले की,”व्यावसायिक इमारतींनी ECBS आणि घरगुती इमारतींनी ECO NIVAS चे पालन केले पाहिजे. तसेच उर्जा साठवणुकीच्या मदतीने विजेची सर्व मागणी जीवाश्म नसलेल्या इंधन पद्धतीने पूर्ण केली पाहिजे.”

सौर सिंचन पंप
ऊर्जा मंत्रालयाने शेतकऱ्यांना डिझेलवर चालणाऱ्या सिंचन पंपांऐवजी सौरऊर्जेवर चालणारे सिंचन पंप वापरण्यास प्रोत्साहित केले आहे. आता सरकारकडून अनेक सौरपंप योजना राबवल्या जात आहेत. या योजनांतर्गत शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपांसाठीही आर्थिक मदत दिली जाते. राज्य सरकारांनीही सौर सिंचन पंप बसवण्यासाठी अनुदान देण्यास सुरुवात केली आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल
सरकारी आकडेवारीनुसार, भारताच्या एकूण इंधनाच्या वापरामध्ये डिझेलचा वाटा सुमारे 2/5 आहे. भारतातील कृषी क्षेत्र हे इंधनाचा, विशेषतः डिझेलचा सर्वाधिक वापर करणाऱ्यांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत सौरऊर्जेचा वापर करण्याचे हे पाऊल सर्वात प्रभावी ठरू शकते. त्यामुळे डिझेलचा वापर कमी होऊन शेतकऱ्यांच्या खर्चातही बचत होणार आहे.

Leave a Comment