हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सरकार कडून अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी विविध घोषणा केल्या. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
अजित पवार म्हणाले, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार अनुदान देण्याचं घोषित केलं होतं पण आर्थिक अडचणीमुळे हे वाटप करण्यात आलं नव्हतं. मात्र ही वचनपूर्ती आता होत आहे. याचा फायदा २० लाख शेतकऱ्यांना होईल. त्याकरता २०२२-२३ मध्ये १०,००० कोटी खर्च अपेक्षित आहे. भूविकास बँकेच्या ३४, ७८८ कर्जदार शेतकऱ्यांची ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1576418862719711
दरम्यान, जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 2 वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
काय आहेत सरकारच्या घोषणा-
मुंबईतील पशुविद्यालयाला 10 कोटींची तरतूद
महसूल विभागात शेळी प्रकल्प उभारणार
६० हजार कृषी पंपांना वीज जोडणी देणार
आरोग्य विभागाला 11 कोटींची तरतूद
सर्व जिल्ह्यात महिला रुग्णालय उभारणार
गोसेखुर्द प्रकल्पाला 850 कोटींचा निधी
संगीत महाविद्यालयासाठी १०० कोटींची तरतूद
तरुणांना विशेष संधी निर्माण करुन देण्यासाठी स्टार्ट अपसाठी भांडवल 100 कोटी रकमेचा शासनाचा स्टार्ट अप फंड उभारण्यात येणार
कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला 50 कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली
एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचे लक्ष्यं