हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात ‘या’ 4 गोष्टींचा करा समावेश

heart
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपलं हृदय हे शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. ह्रदय बंद पडलं तर आपलं आयुष्यच थांबतं . हृदय शरीराला रक्तासोबत ऑक्सिजनचा पुरवठा करते. परंतु अनेक वेळा रोजच्या जीवनातील धावपळ, चुकीच्या खाण्याच्या सवयी, धूम्रपान, ताणतणाव यामुळे हृदयाची समस्या उदभवू शकते. त्यामुळे आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. चला याबाबत जाणून घेऊया… .

1) अक्रोड-

हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही अक्रोडाचे सेवन करू शकता. हे तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित ठेवते, तसेच रक्तदाब कमी करते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासून आपला बचाव होतो.

2) टोमॅटो-

टोमॅटो खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात आणि रक्त गोठण्यापासून संरक्षण देखील करू शकतात. तुम्हाला हवे असल्यास टोमॅटोचा रस पिऊ शकता किंवा भाज्या किंवा सॅलडमध्ये घालून खाऊ शकता. यामुळे तुमचे हृदय मजबूत होऊ शकते.

3) बीट-

निरोगी हृदयासाठी बीटाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. बीटात आयर्न भरपूर प्रमाणात असते. बीटाच्या सेवनाने शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होत नाही. बीटामध्ये ॲंटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

4) पालक –

ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् हृदयासाठी अत्यंत आवश्यक असतात, जे पालकामध्ये पुरेशा प्रमाणात आढळतात. त्यात शरीरासाठी आवश्यक असणारी इतर अनेक जीवनसत्त्वे असतात. तुमच्या आहारात पालकाचा समावेश जरूर करावा.