मुंबई महापालिका आयुक्तांना इनकम टॅक्सची नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव प्रकरणासंबंधी त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. यापूर्वी 10 मार्च 2022 रोजी आयकर विभागाने इकबालसिंह चहल यांना नोटीस पाठवली होती. त्याला चहल यांनी उत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांना आयकरने नोटीस पाठवली आहे.

एप्रिल 2018 ते मार्च 2022 पर्यंत स्थायी समितीने जे-जे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले, जे ठराव पास झाले त्याची सर्व कागदपत्रे घेऊन आयकर विभागाने या आधीच आयुक्त चहल यांना बोलावले होते. आता पुन्हा एकदा यासंबंधी त्यांना बोलावण्यात आले आहे. या चार वर्षांमध्ये जे काही कॉन्ट्रॅक्ट्स देण्यात आले.  त्या सगळ्यामध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा संशय हा आयकर विभागाला आहे.

चहल यांना नोटीस पाठवल्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. यावरून आयकर विभाग अत्यंत काळजीपूर्वक एकएक पाऊल उचलताना दिसत आहे. सध्या इक्बाल सिंह चहल हे वैयक्तिक कारणासाठी दिल्लीत गेले आहेत. आता ही माहिती समोर आल्यानंतर ते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.