हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर राज्यातील महाविकास आघाडीला अजून एक जबर धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 1000 कोटींची संपत्ती जप्त करण्याची नोटीस आयकर विभागाने दिली आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित पाच संपत्ती जप्त करण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अजित पवार हे गेल्या काही महिन्यांपासून आयटीच्या रडारवर आहेत. गेल्या महिन्यात आयकर विभागाने दोन रिअल इस्टेट ग्रुप आणि अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घर आणि कार्यालयांवर छापेमारी केली होती. यावेळी 184 कोटींची बेहिशोबी मालमत्त्ता सापडली होती. आयकर विभागाने 7 ऑक्टोबरपासून 70 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली होती.
गेले १९ दिवस आयकर विभाग आणि आता ईडीचे धाडसत्र आणि शोध ऑपरेशन सुरु आहे. १ हजार ५० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती समोर आली आहे, त्याचबरोबर १८४ कोटी रुपयांची रोकड, दागिने (ज्वेलरी), आर्थिक व्यवहारांचे कागदपत्र इ. इन्कम टॅक्सच्या हाती लागले असल्याचे ट्विटद्वारे माहिती किरीट सोमय्या यांनी दिली होती. त्यानंतर आता आयकर विभागाने ही संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिल्यानं अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.
कोण कोणती संपत्ती जप्तीचे आदेश
जरंडेश्वर शुगर फॅक्ट्री
बाजार मूल्य: सुमारे 600 कोटी
साऊथ दिल्लीमधीली फ्लॅट
बाजार मूल्य: सुमारे 20 कोटी
पार्थ पवार यांचं निर्मल ऑफिस
बाजार मूल्य: सुमारे 25 कोटी
निलय नावाने गोव्यात बनलेला रिसॉर्ट
बाजार मूल्य: सुमारे 250 कोटी
महाराष्ट्रात 27 वेगवेगळ्या ठिकाणी जमीन
बाजार मूल्य: सुमारे 500 कोटी