नवी दिल्ली । आर्थिक वर्ष 2019-20 (मूल्यांकन वर्ष 2020-21) साठी 7 जानेवारीपर्यंत 5.27 कोटींपेक्षा जास्त इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्यात आले. इनकम टॅक्स डिपार्टमेंटने शुक्रवारी ही माहिती दिली.
जर आयटीआर दाखल केला नसेल तर घाई करा, 10 जानेवारी ही शेवटची तारीख आहे
वैयक्तिक करदात्यांसाठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत सरकारने 10 जानेवारीपर्यंत वाढविली आहे. कंपन्यांना रिटर्न भरण्याची तारीख 15 फेब्रुवारी आहे. इनकम टॅक्स डिपार्टमेंटने याबाबत ट्वीट केले आहे की, “2020-21 या मूल्यांकन वर्षात 7 जानेवारी पर्यंत 5.27 कोटींहून अधिक इनकम टॅक्स रिटर्न दाखल केले गेले आहे.”
आर्थिक वर्ष 2018-19 साठी ITR दाखल करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट होती
आर्थिक वर्ष 2018-19 साठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2019 होती. त्यावेळी 5.63 कोटी रिटर्न भरले होते. भरलेल्या इनकम टॅक्स रिटर्नपैकी 2.8 कोटी करदात्यांनी आयटीआर -1 दाखल केले आहेत. त्याचबरोबर 7 सप्टेंबर 2019 पर्यंत ही आकडेवारी 3.1 कोटी होती.
7 जानेवारी, 2021 पर्यंत 1.23 कोटी आयटीआर – 4 दाखल केले गेले, तर त्याच्या तुलनात्मक तारखेला 7 सप्टेंबर 2019 रोजी 1.29 कोटी आयटीआर – 4 दाखल केले गेले.
ITR कोण दाखल करू शकतो
ITR -1 सहज फॉर्म कोणत्याही सामान्य रहिवाश्याद्वारे भरला जाऊ शकतो, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही असे त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नाची माहिती देऊ शकतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.