हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयटी रिटर्न भरण्याची सध्या गडबड चालू आहे. जुलै महिना संपत आला आहे. त्यामुळे सगळेजण आयटी रिटर्नचा फॉर्म भरत आहेत.आयटी रिटर्न भरताना कोणता फॉर्म निवडावा? याबाबत अनेक लोकांना प्रश्न पडत आहे. कारण आयटीआर भरणे हे कायदेशीर आहे. आणि आपल्या संपत्तीनुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म भरावे लागतात. यामध्ये आयटीआरचे फॉर्म बिझनेस किंवा आपल्या उत्पन्नानुसार असतात वैयक्तिक कंपनी पार्टनरशिप फॉर्म यानुसार हे फॉर्म असतात. त्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करून काही फॉर्म ठरवून दिले जातात. ITR 1, ITR2, ITR 3, ITR 4, ITR 5, ITR 6, ITR 7यांचा समावेश असतो. आता कोणता व्यक्ती हे फॉर्म भरू शकतात हे आपण जाणून घेणार आहोत.
ITR 1 कोण भरू शकते
ज्यांचे उत्पन्न पगार किंवा पेन्शन द्वारे मिळते. त्याचप्रमाणे उत्पन्न जे पगार किंवा बिजनेस पेन्शन द्वारे गेमिंग लॉटरी याद्वारे कमावले जाते. त्याचप्रमाणे उत्पन्न हे शेतीद्वारे कमावले जाते. यामध्ये वैयक्तिक उत्पन्न हे 50 लाखापेक्षा जास्त असू नये.
ITR 2 कोण फाईल करू शकते
ज्या व्यक्तीचे उत्पन्न पगार किंवा पेन्शनद्वारे असते. उत्पन्न हे घर मालमत्तेपासून कमावले जाते. त्याचप्रमाणे अनलिमिटेड इक्विटी शेअर्स मधून मिळालेले उत्पन्न शेती व्यवसायातून मिळालेले उत्पन्न, 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर हा फॉर्म भरू शकता.
ITR 3कोण भरू शकतात
रेसिडेंट किंवा नॉन रेसिडेंट त्याचप्रमाणे व्यक्ती जो डायरेक्ट कंपनीचा असतो. पण नाही घर मालमत्तेपासून कमावले जाते. तसेच ज्या व्यक्तीचे उत्पन्न 50 लाखापेक्षा जास्त आहे. तसेच जे उत्पन्न कमावलेले असते ते लोक आयटीआय तीन फाईल करू शकतात.
ITR 4 कोण भरू शकतात
जो व्यक्ती भारतीय आहे. आणि हिंदू अविभक्त कुटुंबात राहतो. तसेच पार्टनरशिप फॉर्मचे उत्पन्न प्रोफेशन किंवा व्यवसायाद्वारे आहे. या व्यक्तीचे उत्पन्न 50 लाखापेक्षा जास्त नसावे. हे उत्पन्न पगार किंवा पेन्शन द्वारे कमावलेले असावे.
ITR 5 कोण भरू शकतात
जे लोक गुंतवणूक करतात, व्यवसाय करतात किंवा एखादी व्यक्तीची संपत्ती ही त्याच्या वडिलोपार्जित वारलेल्या व्यक्तीपासून मिळतात. तो व्यक्ती ITR 4 फाईल करू शकतो.
ITR 6 आणि ITR 7 कोण भरू शकतात
ज्या कंपन्यांना आयकर कायद्याच्या कलम 11 अंतर्गत सूट मिळत नाही. त्यांच्यासाठी आयटीआर फॉर्म 6 आवश्यक आहे. ज्या कंपन्या व्यक्तींना कलम 139 (4A) किंवा कलम 139 (4B) तसेच कलम 139 ( 4C) आणि कलम 139 (4 4D) अंतर्गत ITR भरायचे आहे त्यांना आयटीआर फॉर्म 7 भरणे गरजेचे आहे.