हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण मोहोळ यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असूनमोहोळ यांनी कोथरुडमधील त्यांच्या प्रभागातील सार्वजनिक शौचालय ठेकेदार असलेल्या त्यांच्या भाच्याच्या मदतीने तोडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, पुण्याचे महापौर मोहोळ यांनी कोथरुडच्या भीमनगर भागातील नागरिक ते राहात असलेली जागा सोडून जावेत आणि त्याठिकाणी दुसरा गृहप्रकल्प उभारता यावा यासाठी महापौरांनी सार्वजनिक शौचालय तोडल्याचा त्यांच्यावर आरोप केला आहे.
देविदास ओव्हाळ नावाच्या व्यक्तीने याबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने गुन्हा नोंद करुन तपास करण्याचे आदेश पोलीसांना दिले आहेत. याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांना माध्यमांनी विचारणा केली असता आपण सर्व माहिती घेऊन आपली बाजू मांडू असं त्यांनी सांगितले.