पुन्हा रुग्णसंख्येत वाढ : सातारा जिल्ह्यात नवे ७८८ पॉझिटिव्ह तर १३९ कोरोनामुक्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ओसरू लागली होती. त्यामध्ये सोमवारी पुन्हा वाढ झाल्याचे पहायला मिळाले. सोमवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार चोवीस तासात तब्बल ७८८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. तर काल दिवसभरात १ हजार १३९ कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी माहिती दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची ९ हजार १९६ झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या १ लाख ८७ हजार १२४ इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण १ लाख 7४ हजार ४३२ बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत ४ हजार २२१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दिवसभरात १७ कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात ११ हजार ७४२ जणांचे नमुने घेण्यात आले.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे बाधित होण्याचे प्रमाण १० टक्क्याच्या आत आल्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊनला शिथीलता दिली आहे. नागरिकांनी गाफील न राहता बाजारपेठेमध्ये गर्दी करु नये, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन स्वत:ला व दुसऱ्यांना कोरोनाचा प्रादुभार्व होणार नाही याची खरबदारी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील कोरोना संदर्भातला आढावा काल जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात घेतला. यावेळी त्यांनी जनतेला आवाहन केले. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अयजकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

You might also like