मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काल भारत आणि इंग्लंड यांच्या पार पडलेल्या सामन्यात हार्दिकचा (Hardik Pandya) जलवा पाहायला मिळाला. त्याने फक्त बॅटिंगच नाहीतर बॉलिंग मध्येदेखील उत्तम कामगिरी केली. त्याने कालच्या सामन्यात 51 धावा करत 4विकेट्स घेतल्या. त्याच्या अष्टपैलू कामगिरीसमोर इंग्लंडचा बँड वाजला अन् भारताने हा सामना जिंकून मालिकेत 1-0अशी आघाडी घेतली. मोठ्या कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या हार्दिकचा (Hardik Pandya) खेळ दिवसेंदिवस बहरताना दिसत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील परदेशातील पहिल्याच सामन्यात हार्दिकने (Hardik Pandya) छाप सोडली. कालच्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करताना हार्दिकने आतापर्यंत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम आपल्या नावावर केला आहे.
198 धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरचा भोपळ्यावर त्रिफळा उडवला. हार्दिक पांड्या त्याच्या पहिल्याच षटकात डेवीड मलान (21) व लिएम लिव्हिंगस्टोन (0) यांची विकेट घेतली. 7 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने (Hardik Pandya) जेसन रॉय (4)यालाही माघारी पाठवले. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिकने इंग्लंडच्या हॅरी ब्रुकचा सोपा झेल सोडला. युजवेंद्र चहलच्या षटकात सूर्यकुमार यादवने सेट झालेल्या मोईन अलीचा झेल सोडला. ब्रूक व अली ही जोडी चांगलीच टिकताना दिसली. पण, चहलने पुढच्या षटकात ही जोडी तोडली. ब्रूकला (28) माघारी पाठवताना इंग्लंडला पाचवा धक्का दिला. ब्रूक व अलीने 36 चेंडूंत 61 धावांची भागीदारी केली होती. त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर चहलने आणखी एक विकेट मिळवली. 20 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 36 धावा करणाऱ्या अलीला दिनेश कार्तिकने स्टम्पिंग केले.
हार्दिकने (Hardik Pandya) 4 षटकांत 33 धावा देताना 4 विकेट्स घेतला. ट्वेंटी- 20 त एकाच सामन्यात 50+ धावा व 4विकेट्स घेणारा हार्दिक हा पहिला भारतीय आणि जगातील पाचवा खेळाडू ठरला आहे. याअगोदर ड्वेन ब्राव्हो ( 66* व 4-38 वि. भारत, लॉर्ड्स 2009), मोहम्मद हाफिज ( 71 व 4-10 वि. झिम्बाव्बे, हरारे 2011), शेन वॉटसन ( 59 व 4-15 वि. इंग्लंड, एडलेड 2011) व एस शिनवारी 61 व 4-11 वि. इंग्लंड, साउदहॅम्प्टन 2022) यांनी ही कामगिरी केली आहे. तसेच इंग्लंडमध्ये दोनवेळा एकाच ट्वेंटी-20त चार विकेट घेणाराही तो पहिलाच भारतीय ठरला. यापूर्वी 2018 मध्ये त्याने 38 धावांत 4 विकेट्स घेतल्या होत्या. भारताने हा सामना 50 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
हे पण वाचा :
गेल्या पाच वर्षांत ‘या’ शेअर्सने दिला 450% रिटर्न, गुंतवणूकदार झाले मालामाल
‘या’ अभिनेत्याचं अल्पवयीन मुलींसमोर पार्कमध्ये अश्लील कृत्य; POCSO कायद्यांतर्गत पोलिसांकडून अटक
LIC च्या ‘या’ पॉलिसीद्वारे फक्त 150 रुपयांमध्ये मिळवा 19 लाख रुपये !!!
भरधाव ट्रेनची ट्रकला धडक; अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर
‘या’ 5 शेअर्सनी एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला भरघोस नफा !!!