Multibagger Stock : गेल्या पाच वर्षांत ‘या’ शेअर्सने दिला 450% रिटर्न, गुंतवणूकदार झाले मालामाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचे ध्येय निश्चित केले पाहिजे आणि टार्गेट पूर्ण होताच जास्त वाट न पाहता प्रॉफिट बुकिंग केले पाहिजे असे मत शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार नेहमीच व्यक्त करत असतात. अनेक दिग्गज गुंतवणूकदार देखील असेच करतात. सध्या जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सध्या जोरदार विक्री होते आहे. या वर्षात आतापर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टी 11 मध्ये टक्क्यांहून जास्त घसरण झाली आहे. मात्र असे असूनही विष्णू केमिकल्सचे शेअर्स गेल्या एका वर्षापासून मजबूत रिटर्न देत आहेत. 2022 मध्ये तर या शेअर्सने गुंतवणूकदारांना 75 टक्के रिटर्न दिला आहे. Multibagger Stock

Vishnu Chemicals Limited recommends dividend of Rs. 2 | EquityBulls

हे लक्षात घ्या कि, गेल्या एक वर्षापासून विष्णू केमिकल्सच्या शेअर्सकडून गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळालेला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 855 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 1,502 रुपयांवर पोहोचले आहेत. या कालावधीत या शेअर्समध्ये 75 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी हे शेअर्स 600 रुपयांवर होते. आता त्यामध्ये 150 टक्क्यांनी वाढ होऊन ते 1,502 रुपयांवर आले आहे. गेल्या पाच वर्षांत तर या शेअर्समध्ये 450 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Multibagger Stock

Yes Securities bets on this multibagger stock for over 50% upside; here's  why - BusinessToday

मात्र असे असले तरीही गेल्या महिन्याभरापासून या शेअर्समध्ये विक्री दिसून येते आहे. मागील एका महिन्यात ते सुमारे 1 टक्क्यांनी खाली आले आहेत. त्याच वेळी, गेल्या पाच ट्रेडिंग सेशनमध्ये हे शेअर्स 2.72 टक्क्यांनी घसरले आहेत. 7 जुलै रोजी देखील या शेअर्समध्ये 1.10 टक्क्यांची घसरण होऊन 1,,453 रुपयांवर आला आहे.Multibagger Stock

Multibagger Stocks Tips: दो महीने में पैसा डबल, इस टेक्सटाइल स्टॉक ने किया  मालामाल! - Best multibagger stocks list investors return double lagnam  spintex share price tuts - AajTak

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://vishnuchemicals.com/

हे पण वाचा : 

LIC च्या ‘या’ पॉलिसीद्वारे फक्त 150 रुपयांमध्ये मिळवा 19 लाख रुपये; कसे ते जाणून घ्या

Stock Market : ‘या’ 5 शेअर्सनी एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला भरघोस नफा !!!

HDFC Bank च्या ग्राहकांना धक्का !!! बँकेने आजपासून लागू केला हा नवा नियम

Aadhar Card चे व्हेरिफिकेशन करणे महत्वाचे का आहे ??? समजून घ्या

Gold Price Today : आज सोन्या-चांदीच्या भावात वाढ, नवीन दर पहा

Leave a Comment