भारताविरुद्धच्या सीरिजसाठी इंग्लंडच्या टीमची घोषणा, ‘हा’ धोकादायक खेळाडू बाहेर

England Team
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लंडन : वृत्तसंस्था – इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या पहिल्या 2 टेस्टसाठी टीमची घोषणा केली आहे.4 ऑगस्टपासून या सीरिजला सुरुवात होणार आहे. या टीमचे नेतृत्व जो रूटकडे देण्यात आले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या सत्राची दोन्ही टीमची ही पहिलीच सीरिज असणार आहे, त्यामुळे दोन्ही टीम चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील.

फास्ट बॉलर ओली रॉबिनसनचे टीममध्ये पुनरागमन झालं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजदरम्यान सोशल मीडियावरच्या वादामुळे रॉबिनसनचे निलंबन करण्यात आले होते. रॉबिनसनसोबत बेन स्टोक्स, जॉस बटलर, जॉनी बेयरस्टो आणि सॅम करन यांचेसुद्धा टीममध्ये पुनरागमन झालं आहे. फास्ट बॉलर क्रिस वोक्सला दुखापतीमुळे टीममध्ये जागा मिळाली नाही, तर जोफ्रा आर्चर शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे फिट झाला नाही, त्यामुळे तोदेखील पहिल्या दोन टेस्टमध्ये खेळणार नाही आहे.

या सीरिजसाठी इंग्लंडची टीम
जो रूट (कर्णधार), जेम्स एंडरसन, जॉनी बेयरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जॉस बटलर, जॅक क्रॉले, सॅम करेन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिनसन, डॉम सिब्ले, बेन स्टोक्स, मार्क वूड

भारत-इंग्लंड यांच्यातील सीरिजचे वेळापत्रक
पहिली टेस्ट : ट्रेन्ट ब्रिज, 4 ऑगस्ट

दुसरी टेस्ट : लॉर्ड्स, 12 ऑगस्ट

तिसरी टेस्ट : हेडिंग्ली, 25 ऑगस्ट

चौथी टेस्ट : ओवल, 2 सप्टेंबर

पाचवी टेस्ट : ओल्ड ट्रॅफर्ड, 10 सप्टेंबर