नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा दोन्ही संघात पुनरागमन करेल. तर विराट कोहली, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह सारखे अनेक सीनियर खेळाडू पहिल्या T20 सामन्यात खेळणार नाहीत. त्यांना शेवटच्या 2 टी-20 सामन्यांसाठी संघात स्थान मिळाले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या संघात (IND vs ENG) अर्शदीप सिंगचा टी-20 सोबत वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. तर उमरान मलिकला फक्त टी-20 संघात स्थान मिळाले आहे. याचबरोबर ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांचा केवळ पहिल्या टी-20 सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे.
7 जुलै ते 17 जुलै यादरम्यान हे सगळे सामने होणार आहेत. इंग्लंड मालिकेसाठी (IND vs ENG) जाहीर करण्यात आलेल्या संघावर नजर टाकली तर वेगवान गोलंदाज उमरान मलिकला तिन्ही टी-20 सामन्यांसाठी संघात स्थान मिळाले आहे. मात्र, त्याला वनडे संघात स्थान देण्यात आलेले नाही. तसेच डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्धच्या T20 मालिकेदरम्यान संघामध्ये होता. पण, आता त्याला खेळण्याची संधी मिळालेली नव्हती. यावेळी त्याला टी-20 आणि वनडे या दोन्ही संघात स्थान मिळाले आहे.
शेवटच्या दोन T-20 मधून बाहेर
अर्शदीप सिंगला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 साठी संघात स्थान मिळाले आहे. मात्र, तो शेवटच्या 2 सामन्यांसाठी बाहेर राहणार आहे. मात्र, 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी या युवा गोलंदाजाची संघात (IND vs ENG) निवड करण्यात आली आहे. संजू सॅमसन आणि ऋतुराज यांची पहिल्या T20 साठी निवड झाली आहे, पण त्यांना शेवटच्या 2 साठी संघात स्थान मिळू शकले नाही. त्याचबरोबर दीपक हुडा आणि इशान किशन यांची तिन्ही टी-20 साठी निवड झाली आहे. एकदिवसीय मालिकेसाठी इशानला संघात स्थान मिळाले आहे.
इंग्लंड मालिकेसाठीचा (IND vs ENG) संघ पुढीलप्रमाणे –
वनडे मालिकेसाठी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, शमी मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.
पहिल्या T20 साठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
दुसऱ्या आणि तिसऱ्या T20 साठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान आणि उमरान मलिक.
हे पण वाचा :
शिवसैनिक आक्रमक!! श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले
आम्ही शिवसेनेचेच सदस्य, काँग्रेस- राष्ट्रवादीनेच सेनेला हायजॅक केलं
हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा; मुख्यमंत्र्यांचा शिंदेवर हल्लाबोल
साताऱ्यात आ. शंभूराज देसाई यांच्या विरोधात आंदोलन
मुंबईत 10 जुलै पर्यंत जमावबंदी लागू