नवी दिल्ली । विराट कोहली गेल्यानंतर रोहित शर्मा भारतीय T20 संघाचा कर्णधार झाला. आता पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित बुधवारी जयपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध डावाची सुरुवात करेल. रोहित शर्माने यापूर्वी अनेकवेळा टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे, मात्र पूर्णवेळ कर्णधार म्हणून तो पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे.
यापूर्वी रोहित शर्माने 19 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून त्यापैकी 15 सामने जिंकले आणि 4 सामने गमावले. कर्णधार म्हणून रोहितची T20 क्रिकेटमधील विजयाची टक्केवारी 78.95 आहे. कसोटी खेळणाऱ्या देशांतील 53 T20 कर्णधारांमध्ये रोहितची विजयाची टक्केवारी ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च आहे.
या लिस्टमध्ये अफगाणिस्तानचा माजी कर्णधार आणि क्रिकेटर असगर अफगाण अव्वल स्थानावर आहे, ज्याची विजयाची टक्केवारी 80.77 आहे. रोहित शर्माने एक कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 712 धावा केल्या आहेत, ज्यात 2 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 2 शतके करणारा तो एकमेव कर्णधार आहे.