IND vs SA T20 : टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूचे करिअर धोक्यात, दुसऱ्या सामन्यातही मिळाली नाही संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कटक : वृत्तसंस्था – आज कटकमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 (IND vs SA T20) सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही. पहिल्या सामन्यात (IND vs SA T20) टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे दुसऱ्या मॅचवेळी टीम इंडियात बदल होईल, असे वाटत होते मात्र तसे काहीच झाले नाही. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह या दिग्गजांशिवाय टीम इंडिया या सीरिजमध्ये (IND vs SA T20) खेळत आहे.

आयपीएलमधल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचे टीम इंडियात कमबॅक झालं आहे. पहिल्या टी-20 सामन्यात हार्दिकने आक्रमक खेळी करत भारताचा स्कोअर 210 रनच्या पुढे नेला होता, याशिवाय त्याने बॉलिंगसुद्धा केली होती. हार्दिकच्या या ऑलराऊंड कामगिरीमुळे व्यंकटेश अय्यरचे करिअर धोक्यात आले आहे. आजच्या सामन्यात (IND vs SA T20) व्यंकटेश अय्यरला बेंचवरच बसावे लागलं आहे.

करियर संकटात
व्यंकटेश अय्यर टी-20 वर्ल्ड कप 2021 नंतर टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये होता, पण तेव्हा हार्दिक पांड्या दुखापतीमुळे टीम इंडिया बाहेर होता. हार्दिकच्या पुनरागमनामुळे मात्र व्यंकटेश अय्यरचे करिअर धोक्यात आले आहे. व्यंकटेश अय्यरला टीममध्ये हार्दिक पांड्याचा बॅकअप म्हणून ठेवण्यात आले आहे.

अय्यर खराब फॉर्ममध्ये
आयपीएल 2021 मध्ये व्यंकटेश अय्यरने केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली. मागच्या सहा महिन्यांपासून व्यंकटेश अय्यर चांगल्या फॉर्मसाठी संघर्ष करत आहे. आयपीएल 2022 आधी केकेआरने व्यंकटेश अय्यरला 8 कोटी रुपयांना रिटेन केले होते. या मोसमात त्याने 12 मॅचमध्ये 16.55 च्या सरासरीने 182 रन केले होते. त्याच्या खराब कामगिरीमुळे केकेआरने व्यंकटेश अय्यरला काही सामन्यांमध्ये बाहेर बसवले होते.

हे पण वाचा :
7 वर्षांच्या मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, आत्महत्या की हत्या? गूढ कायम

Cristiano Ronaldoची ‘त्या’ 13 वर्षे जुन्या खटल्यातुन निर्दोष मुक्तता

कल्याणमध्ये CCTV कॅमेरा फिरवून चोरट्यांचा दुकानावर डल्ला

सोम्या- गोम्याच्या ट्विटला मी उत्तर देत नाही : अजित पवार

देवेंद्र भुयारची लायकी माहिती असल्याने स्वाभिमानीतून हकालपट्टी केली : राजू शेट्टी

Leave a Comment