व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सोम्या- गोम्याच्या ट्विटला मी उत्तर देत नाही : अजित पवार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

ए असल्या कुठल्या सोम्या- गोम्याच्या ट्विटला महत्व देत नाही, असे सांगत भाजप नेते निलेश राणेंनी केलेल्या ट्विटवर आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

वरकुटे – मलवडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माण – खटाव तालुक्यासाठी 2.5 टीएमसी पाणी आरक्षित केल्याबद्दल कृतज्ञता समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रभाकर देशमुख यांची उपस्थिती होती. सातारा एमआयडीसीत खंडणीखोर कोण आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाषांत सांगितलं यावर विचारलं असता. अजित पवार पत्रकारांवर भडकले आणि पत्रकारांनाच कधीतरी खरं बोला असे सांगत प्रतिप्रश्न केला. तुम्हाला माहिती ना का? असा सवाल केला.

 

निलेश राणेंनी काय ट्विट केले

अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडिया सारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल पण बरं झालं अजित पवार यात पडले नाही कारण पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाही ते बाहेरून आमदार कुठून आणणार.