IND VS SL : संघ बदलला पण भारताची ‘ती’ सवय नाही बदलली; असंच राहिल्यास आज होऊ शकतो पराभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वर्ष बदललं, भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) आपला संघही बदलला, कर्णधार बदलला पण आपली जुनी सवय मात्र टीम इंडिया बदलू शकली नाही. श्रीलंकेविरुद्धच्या (IND VS SL) पहिल्या T-20 सामन्यात कसाबसा विजय मिळवला. मात्र असच सुरु राहील तर आजच्या दुसऱ्या T-20 सामन्यात मात्र भारतीय संघाला पराभवाची चव चाखावी लागू शकते.

कोणती आहे ती सवय –

खरं तर आपण अनेक वर्षांपासून पाहत आलो कि जेव्हा जेव्हा भारताचे आघाडीचे फलंदाज (Top Order Batsman) लवकर बाद होतात तेव्हा तेव्हा मधल्या फळीतील (Middle Order) फलंदाजांवर दडपण येत आणि त्यातच ते सुद्धा बाद होतात. यापूर्वी रोहित शर्मा, विराट कोहली आणि शिखर धवन लवकर बाद झाले तर भारताची फलंदाजी पूर्णपणे कोसळत होती. आता सुद्धा नवे सलामीवीर आले, मधल्या फळीत नवे फलंदाज आले मात्र जुनी सवय काय बदलायचं नाव घेईना. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T-20 सामन्यात पण हेच घडलं. तिथे भारताची टॉप ऑर्डर अपयशी ठरली, तेव्हा संघावरील दडपण स्पष्टपणे दिसत होते. परिणामी 14.1 षटकात अवघ्या 92 धावांत निम्मा संघ डगआऊटवर परतला.

केवळ श्रीलंकन फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताने अखेरच्या षटकात कसाबसा विजय मिळवला. नाहीतर वानखेडेवर 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे ही काही मोठी गोष्ट नाही. मुंबईत आपण कसातरी विजय मिळवला हे खरं आहे. मात्र असच सुरु राहील आणि भारतीय बॅटिंग ऑर्डर पुन्हा गडगडली तर आजच्या पुण्यातील दुसऱ्या T-20 सामन्यात मात्र भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो.