कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मुंढे विविध कार्यकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ओम जानाईदेवी शेतकरी विकास पॅनेलने 11-2 असे वर्चस्व राखत, तब्बल 40 वर्षानंतर सत्तांतर घडविले. या ऐतिहासिक विजयाबद्दल घोणशी (ता. कराड) येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालक आनंदराव जमाले, भीमराव जमाले, ज्ञानेश्वर जमाले, प्रताप सावंत, महादेव साळवे, आप्पा साळवे, वसंत माळी, ज्ञानेश्वर गावडे, भीमराव केंगार, प्रताप भंडलकर, दादा संकपाळ, धोंडूबाई मोरे, जयश्री साळवे यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, मुंढे हे गाव कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात असले तरी या गावाचे पहिल्यापासून स्व. पी. डी. पाटील साहेबांशी ऋणानुबंध आहेत. स्व. पी. डी. पाटील व सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांची अतूट मैत्री होती. सहकारामध्ये दोघांनी एकमेकांना समजून शेतीपूरक व्यवसायासाठी लिफ्ट इरिगेशन योजनांची अंमलबजावणी करून, शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून दिले. मुंढे सोसायटीमध्ये झालेले सत्तांतर हे गेल्या वर्षभरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या कामांची पोचपावती आहे.
याप्रसंगी सरपंच अनिता जमाले, रमेश लवटे, संभाजी साळवे, बाजीराव चव्हाण, प्रशांत चव्हाण, अशोक माळी, योगेश जमाले, नाथा सावंत, प्रकाश सावंत, राहुल लोंढे, बाळासो हातेकर, महंमद आवटे, सागर पाटील यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.