किसनवीर कारखान्यांत अखेर सत्तांतर : आबा, काकांची जादू चालली तर मदन भोसले, आ. महेश शिंदेंचे पानिपत

सर्वच्या सर्व 21 जागांवर एकहाती विजय

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

वाई तालुक्यातील भुईंज येथील किसन वीर साखर कारखान्यांच्या निवडणूकीत रंगत येईल असे वाटत होते. मात्र, आ. मकरंद पाटील (आबा) आणि जिल्हा बॅंकेचे चेअरमन नितीन पाटील (काका) यांनी एकतर्फी सत्तांतर करत सत्ताधाऱ्यांची हवा काढून टाकली. कारण किसनवीर बचाव शेतकरी पॅनेलमधील सर्वच्या सर्व 21 जागांवर एकतर्फी विजय मिळवला आहे. विजयी कपबशीने विमानाला आकाश न दाखवता जमीनचवरच आपटले. विजयानंतर किसनवीर बचाव शेतकरी पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजयाचा आनंद साजरा केला.

भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेल विरूध्द माजी आमदार व कारखान्याचे माजी चेअरमन मदन भोसले आणि कोरेगाव मतदार संघाचे शिवसेनेचे विद्यमान आ. महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेल अशी लढत झाली. पहिल्या फेरीपासून सत्ताधारी शेतकरी विकास पॅनेलला धक्के बसत गेले, अखेर सर्वच्या सर्व जागांवर पराभव झाल्याने सत्ताधाऱ्यांचा गड कोसळला अन् मतदारांनी सत्तांतर घडवले. या निवडणुकीत 69 टक्के मतदान झाले होते. त्याची मतमोजणी वाईतील श्रीनिवास मंगल कार्यालय एमआयडीसी येथे पार पडली.

गट 1 – कवठे खंडाळा ऊस उत्पादक- चिन्ह- कपबशी (विजयी)- रामदास (बाळासाहेब) गाढवे(22,155), नितीन पाटील-जाधव (22,244), काळोखे किरण (21,716), (पराभूत) चिन्ह- विमान- दत्तात्रय गाढवे(12,693), प्रवीण जगताप (12,453), प्रताप यादव (12,516)

गट 2 – भुईंज ऊस उत्पादक -चिन्ह- कपबशी (विजयी)- प्रकाश धरगुडे (21,679), रामदास इथापे (21,568), प्रमोद शिंदे (21,560), (पराभूत) चिन्ह- विमान- मदन भोसले (12,970), दिलीप शिंदे (12,366), जयवंत पवार (12,653), अपक्ष- मानसिंग शिंगटे(152)

गट 3 – बावधन ऊस उत्पादक- चिन्ह- कपबशी (विजयी- दिलीप पिसाळ(22,359), शशिकांत पिसाळ(22,058), हिंदुराव तरडे(21469), (पराभूत) चिन्ह- विमान- सचिन भोसले (12,837), विश्वास पाडळे(12,523), चंद्रसेन शिंदे(12,348),

गट 4 – सातारा ऊस उत्पादक- चिन्ह- कपबशी (विजयी)- संदीप चव्हाण(22,110), सचिन जाधव(22,036), बाबासाहेब कदम(21,833), (पराभूत) चिन्ह- विमान- चंद्रकांत इंगवले(12,676), भुंजगराव जाधव(12,401), अनिल वाघमळे(12,211), अपक्ष- नवनाथ साबळे(171)

गट 5 – कोरेगाव ऊस उत्पादक  -चिन्ह- कपबशी (विजयी) – ललित मुळीक(21,567), संजय फाळके(21,673), सचिन साळुंखे(21,532), (पराभूत) चिन्ह- विमान- मेघराज भोईटे12,787), नवनाथ केंजळे(12,407), शिवाजी पवार(12,359), अपक्ष- दिलीप जाधव(158), रमेश माने(80).

महिला राखीव गट- चिन्ह – कपबशी (विजयी)- सरला श्रीकांत वीर(21,562), सुशीला भगवानराव जाधव(22,394), (पराभूत) चिन्ह- विमान- आशा दत्तात्रय फाळके(12,963), विजया जयवंत साबळे(12,878) .

सोसायटी मतदारसंघ (मतदान 331) – चिन्ह- कपबशी (147 मतांनी विजयी)- आ. मकरंद पाटील 238 मते, (पराभूत) चिन्ह- विमान- रतनसिंह शिंदे 91 मते. भटक्या विमुक्त जाती जमाती- कपबशी (विजयी)- हणमंत चवरे(22,661), (पराभूत) चिन्ह- विमान- काळे चंद्रकांत(13,062).

अनुसूचित जाती जमाती -गट- कपबशी (9 हजार 926 मतांनी विजयी)- संजय कांबळे- (22,724)मते, (पराभूत) चिन्ह- विमान- सुभाष खुडे- (12, 798), इतर मागासवर्ग प्रवर्ग- कपबशी (विजयी)- शिवाजी जमदाडे(22,610), (पराभूत) चिन्ह- विमान- आनंदा जमदाडे(13,095)