हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडिया आणि भारत या दोन्ही नावावरून देशात नवीन वाद सुरू झाला आहे. केंद्र सरकार देशाचे नाव भारत करण्याच्या विचारात असल्याची टीका विरोधकांककडून होत आहे. तर दुसरीकडे INDIA आघाडीच्या नावावर देखील सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीचे नाव बदलण्यावरून सूचक संकेत दिले आहेत. “I.N.D.I.A. या नावामुळे देशाचा खर्च वाढत असेल तर आम्ही आघाडीचे नाव बदलण्याचा विचार करू शकतो” असे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हणले आहे. त्यामुळे आता आघाडी पुन्हा I.N.D.I.A नाव बदलण्याच्या विचारात आहे का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मनोज जरांगे पाटलांची सरकारकडे मोठी मागणी; GR मधील 'त्या' 2 शब्दांत सुधारणा कराhttps://t.co/KH3QjkUJT8#Hellomaharashtra @mieknathshinde
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 7, 2023
ओमर अब्दुल्ला काय म्हणाले?
सध्या देशात इंडिया आणि भारत या नावावरुन सत्ताधारी आणि विरोधकांच्यात वाद निर्माण झाला आहे. या वादामध्ये ओमर अब्दुल्ला इंडिया आघाडीच्या नावाबाबत सूचक संकेत दिले आहेत. त्यांनी म्हणले आहे की, “आम्ही आमच्या आघाडीचे नाव बदलू I.N.D.I.A. या नावामुळे देशाचा खर्च वाढू शकतो, असे वाटत असेल तर आघाडीचे नाव बदलण्याचा विचार करू शकतो. या नावामुळे आम्हाला देशवासीयांना त्रास द्यायचा नाही” मुख्य म्हणजे, यापूर्वी देखील इंडिया आघाडीतील काही नेत्यांनी आघाडीला देण्यात आलेले इंडिया नाव बदलण्याचे संकेत दिले होते. मात्र अद्याप आघाडीकडून I.N.D.I.A नाव बदलण्यात येण्याची घोषणा करण्यात आलेली नाही.
VIDEO | “We will change the name of our (alliance) as we don’t want to jeopardise and trouble our nation. We have not come to increase the expenses of the nation. If we get an indication that this is being done because the name of our alliance is INDIA, then we will change our… pic.twitter.com/PmOC6udyrm
— Press Trust of India (@PTI_News) September 6, 2023
इंडिया आणि भारत नावावरून वाद
देशात I.N.D.I.A आघाडी स्थापन झाल्यापासून आघाडीच्या नावाबाबत अनेक टीका टिपणी करण्यात आली आहे. तर आघाडीतीलच काही नेत्यांना हे नाव आवडले नसल्याचे देखील म्हटले जात आहे. अद्याप आघाडीचे चिन्ह देखील समोर आलेले नाही. त्यामुळे पुढे जाऊन इंडिया आघाडीचे नाव बदलू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या राज्यात मोदी सरकार देशाचे नाव भारत करण्याचा विचार करत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशातच आघाडी देखील इंडिया नाव बदलण्याचा निर्णय घेईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.