लढा कोरोनाशी | आपण याला तिसरा टप्पा म्हणत आहोत. औपचारिकरित्या आपण असे म्हणू शकत नाही. ही तिसऱ्या टप्प्याची सुरुवात आहे – (डॉ. गिरीधर ज्ञानी, COVID-19 हॉस्पिटल फोर्स टास्क संयोजक.)
द क्विन्टला दिलेल्या मुलाखतीत COVID-19 हॉस्पिटल फोर्स टास्कचे संयोजक गिरीधर ज्ञानी यांनी असा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २४ मार्च रोजी झालेल्या प्रमुख डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा पुरवठादार यांच्या बैठकीला ते उपस्थित होते. दरम्यान, ‘सामुदायिक प्रसाराचा उद्रेक हा सर्वात अवघड टप्पा आहे. या टप्प्यावर साथीच्या रोगाचा प्रसार समाजात झपाट्याने होऊ लागतो आणि त्याचा मूळ स्रोत शोधणे कठीण होऊन जाते. येत्या ५ ते १० दिवस साथीवर नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे, कारण ज्यांना लक्षणे दिसत नाहीत त्यांना ती दिसण्याची शक्यता आहे. आम्ही खूप कमी वेळात COVID-19 ची रुग्णालये उभी करीत आहोत. कारण येत्या आठवड्यात कोणत्याही दिवशी त्याचा उद्रेक होऊ शकतो. आणि आपल्याकडे पुरेशा प्रमाणात प्रशिक्षित रुग्णालय कर्मचारी आणि COVID-19 ची रुग्णालये ही नाहीत.’ असे ज्ञानी म्हणाले.
सरकारकडे पुरेसे तपासणी किट नाहीत. – “सरकार अजूनही खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी तीन लक्षणे एकत्रित दिसणाऱ्यांचीच केवळ तपासणी करीत आहे. जर रुग्णाला एकच लक्षण असेल तर त्यांची चाचणी केली जात नाही. कोरोना विषाणूच्या चाचण्या घेण्यासाठी सरकार अजूनही जुन्या कठोर धोरणांचे अनुसरण करत आहे. यामध्ये तातडीने बदल होणे गरजेचे आहे. जर एखाद्या व्यक्तीला फक्त ताप आला असेल तर तिला COVID-19 ची तपासणी करता येत नाही. ते डॉक्टर तुम्हाला एखाद्या खाजगी किंवा सरकारी दवाखान्यात जाऊन तापावर उपचार घ्यायला सांगतात. पण कोरोना विषाणूचा संसर्ग त्या व्यक्तीस होऊ शकतो. मुद्दा असा आहे की सरकारला भीती आहे की, या अशा अनिश्चित चाचण्या केल्या तर सगळे किट संपून जातील. म्हणून COVID- 19 च्या पुरेशा तपासण्या होत नाहीत. कारण सरकारकडे पुरेसे तपासणी किट नाहीत. जर आपण संक्रमणाची साखळी तोडू पाहत आहोत तर केवळ लक्षणे असणाऱ्यांनाच तपासणे असे न करता सरकारने पुन्हा नव्याने आखणी केली पाहिजे असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
‘रुग्णाला एका जागेवरून दुसऱ्या जागी नेण्याची मोठी चिंता’ – ज्ञानी म्हणाले, “सरकारने ११८ चाचणी प्रयोगशाळांची उभारणी केली आहे. ज्यामध्ये दर दिवशी १५००० लोकांची तपासणी होऊ शकते. या व्यतिरिक्त १६ खाजगी प्रयोगशाळा उपलब्ध आहेत आणि आणखी काही वाढत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काही खाजगी रुग्णालयांच्या मदतीने सरकारी रुग्णालये COVID- 19 रुग्णालयांत रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. खाजगी दवाखाने औषधे, वैद्यकीय साधने आणि प्रशिक्षित डॉक्टर पुरवू शकतील. पण आव्हान असे आहे की आधी COVID रुग्णालये ठरवून, मग तिथल्या डॉक्टर, नर्सेस आणि सहकाऱ्यांना प्रशिक्षण देणे. काही वैद्यकीय महाविद्यलयांची वसतिगृहे रिकामी करण्यास सांगितले असता, पंतप्रधान म्हणाले की वसतिगृहे रिकामी का करायची उलट जे विद्यार्थी अंतिम वर्षात आहेत त्यांनी महाविद्यालयातच राहावे म्हणजे ते या आपात्कालात मदत करू शकतील. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना थोड्याशा प्रशिक्षणासह एक प्रमाणपत्र देऊन COVID रुग्णालयांत तैनात करण्यात येऊ शकते.”
‘उदाहरणादाखल आपण असे समजू की दिल्लीची लोकसंख्या ३ करोड इतकी आहे तर आपण ३००० रुग्णालयांचे कॉट उपलब्ध ठेवले पाहिजेत. आणि ज्यांना वेगळे ठेवणे आवश्यक आहे. आणि जे कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत अशांसाठी काही वेगळी covid केंद्रे पण आवश्यक आहेत. काही वसतिगृहे आणि विश्रामगृहे अशा केंद्रांत रूपांतरित करता येऊ शकतात. उत्तरप्रदेश मधील बिजनोर गावातील लोकसंख्या लक्षात घेता त्यांना ६०० कॉटची आवश्यकता भासेल पण तिथे एवढे रुग्णालय कॉट मिळणार नाहीत. कारण तिथे केवळ छोटी रुग्णालये अस्तित्वात आहेत. म्हणून अनेक छोटे दवाखाने एकत्र आणले पाहिजेत. रुग्णांना व्यवस्थित ने-आण करण्याची व्यवस्था केली आहे का याची खात्री करून घेतली पाहिजे. हा एक महत्वाचा प्रयोग आहे आणि मी सुचवलेल्या सूचनांपैकी एक आहे.’ असे त्यांनी सांगितले
कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण ३० जानेवारी ला सापडला होता. आपल्याकडे या साथीच्या आजारासाठी तयार राहण्यासाठी पुरेसा वेळ होता. डॉ ज्ञानी यांच्या म्हणण्यानुसार, आपण आता तिसऱ्या टप्प्यात आहोत, आणि या साथीच्या आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आहे का? हा एक मोठा प्रश्न आहे.
असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हायडर चे संस्थापक डॉ गिरीधर ज्ञानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आरोग्य सेवा व्यावसायिकांच्या २४ मार्च रोजी एनआयटीआयच्या पुढाकाराने COVID-19 हॉस्पिटल फोर्स टास्क संयोजक क्षमताच्या संदर्भात झालेल्या बैठकीत भाग घेतला होता. ते गुणवत्ता व्यवस्थापन विषयात पीएचडी प्राप्त अभियंता आहेत.
(हा लेख २६ मार्च रोजी प्रकशित झाला होता, स्पष्टता येण्यासाठी २७ मार्च रोजी याचे संपादन करण्यात आले आहे. अनुवादक – जयश्री देसाई.)
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’
हे पण वाचा –
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २०३ वर, दिवसभरात २२ नवे रुग्ण, तुमच्या जिल्ह्यात किती पहा
भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?
भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी
बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला
भारतात ‘या’ ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!
नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन