अ‍ॅडलेडमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्याअगोदर टीम इंडियाला सतावत आहे ‘हि’ चिंता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था – टी20 वर्ल्ड कप अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. आज इंडिया आणि इंग्लंडमध्ये दुसरा सेमी फायनलचा मुकाबला होणार आहे. जर भारताने हा सामना जिंकला तर तो रविवारी पाकिस्तानविरुद्ध महामुकाबला खेळणार आहे. या स्पर्धेमध्ये टीम इंडिया जरी फॉर्ममध्ये असली तरी टीम इंडियाला रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फॉर्मची चिंता सतावत आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) या फॉर्मबाबत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे.

रोहितचा आऊट ऑफ फॉर्म
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या कुशल नेतृत्वानं सर्वांनाच प्रभावित केलं आहे. रोहित पहिल्यांदाच आयसीसीच्या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. रोहित शर्मा मात्र यंदाच्या वर्ल्डकपमध्ये विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याने आतपर्यंत झालेल्या 5 मॅचमध्ये केवळ 89 धावा केल्या आहेत. त्यामुळे गावस्कर यांच्या मते रोहितचा हाच फॉर्म ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब ठरु शकते. या स्पर्धेत लोकेश राहुल, विराट कोहली, आणि सूर्यकुमार यादव हे जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे रोहितचे (Rohit Sharma) हे अपयश झाकले गेले आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धचा सामन्यात चाहत्यांना रोहितकडून मोठी अपेक्षा असणार आहे.

वर्ल्ड कपमध्ये चौथ्यांदा आमने – सामने
टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड आतापर्यंत तीन वेळा आमने सामने लढले आहेत. या अगोदर 2007, 2009 आणि 2012 सालच्या वर्ल्ड कपमध्ये या दोन्ही टीम आमने – सामने आल्या होत्या. यामध्ये टीम इंडिया दोन वेळा विजयी झाली तर इंग्लंड एकवेळा विजयी झाला आहे. त्यामुळे तब्बल 10 वर्षांनी भारत आणि इंग्लंड संघात टी20 वर्ल्ड कपचा सामना होणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या सामन्यात जो जिंकले तो रविवारी अंतिम सामन्यात पाकिस्तानबरोबर भिडणार आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती