व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

‘चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत देखील बनवत आहे धोकादायक ‘हायपरसोनिक मिसाईल’, अमेरिकेन संसदेचा दावा

वॉशिंग्टन । अमेरिकन संसदेच्या एका स्वतंत्र रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की,’हायपरसोनिक मिसाईल (Hypersonic Missile) विकसित करणाऱ्या काही देशांमध्ये भारताचा समावेश आहे. अमेरिकन संसदेचा हा रिपोर्ट अशा वेळी आला आहे जेव्हा नुकत्याच मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, चीनने अणु सक्षम हायपरसोनिक मिसाईल प्रक्षेपित केले आहे, ज्याने आपले लक्ष्य गमावण्यापूर्वी संपूर्ण पृथ्वीला फेरी घातली. या चाचणीने चीनने अमेरिकन गुप्तचर संस्थांना आश्चर्यचकित केले आहे.

अमेरिका, रशिया आणि चीनमध्ये हायपरसोनिक शस्त्रास्त्रांचे सर्वात प्रगत प्रोग्रॅम सुरु आहेत, मात्र ऑस्ट्रेलिया, भारत, फ्रान्स, जर्मनी आणि जपानसह काही इतर देशही हायपरसोनिक शस्त्रास्त्रांचे तंत्रज्ञान विकसित करत आहेत, असे स्वतंत्र कॉंग्रेसनल रिसर्च सर्व्हिस (CRS) ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. CRS ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि भारत यांनी या संदर्भात रशियाशी करार केला आहे. CRS च्या रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे की, ‘भारताने रशियासोबत मॅक 7 हायपरसोनिक क्रूझ मिसाईल ब्रह्मोस 2 विकसित करण्यासाठी करार केला आहे.’

या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,’ जरी ब्रह्मोस 2 सुरुवातीला 2017 मध्ये तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असले तरी बातम्या असे सूचित करतात की, हा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे आणि आता 2025 ते 2028 दरम्यान तो पुन्हा सुरु होणे अपेक्षित आहे. आता लक्ष्य निर्धारित केले गेले आहे.’ CRS ने सांगितले की, “भारत आपल्या हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल प्रोग्रॅम अंतर्गत स्वदेशी, दुहेरी-सक्षम हायपरसोनिक क्रूझ मिसाईल विकसित करत आहे आणि जून 2019 ते सप्टेंबर 2020 दरम्यान मॅक 6 स्क्रॅमजेटची यशस्वी चाचणी केली आहे.”

चीनने ऑगस्टमध्ये आण्विक मिसाईलची चाचणी केली
अमेरिकन संसदेच्या या विषयावरील तज्ज्ञांनी तयार केलेल्या संसदेच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की,”भारत सुमारे 12 हायपरसोनिक पवन सुरंग चालवतो ,जे मॅक 13 पर्यंतच्या वेगाची चाचणी करण्यास सक्षम आहे.” फायनान्शियल टाइम्स या वृत्तपत्राच्या बातमीनुसार, चीनने ऑगस्टमध्ये आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी केली, ज्याने आपल्या लक्ष्याकडे वेगाने जाण्यापूर्वी पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण केली. त्यात म्हटले आहे की, अमेरिकन गुप्तचर संस्थांनाही या चाचणीमुळे आश्चर्य वाटले. मात्र, चीनने सांगितले की,”त्याने हायपरसोनिक व्हेइकलची चाचणी केली आहे आण्विक हायपरसोनिक मिसाईलची नाही. प्रमुख ब्रिटिश वृत्तपत्राने आपल्या बातमीत दावा केला आहे की,’चीनने प्रगत अवकाश क्षमता असलेल्या हायपरसोनिक मिसाईलची चाचणी केली आहे, ज्याचे लक्ष्य सुमारे 24 मैलांच्या अंतरापर्यंत चुकले आहे.”

भारत रशियाच्या मदतीने तयार करत आहे हायपरसोनिक मिसाईल
CRS च्या मते, हायपरसोनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी अमेरिकेने 2007 पासून हायपरसोनिक इंटरनॅशनल फ्लाइट रिसर्च एक्सपेरिमेंटेशन (HIFIRE) कार्यक्रमाबाबत ऑस्ट्रेलियाशी करार केला आहे. भारताप्रमाणे हायपरसोनिक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी फ्रान्सनेही रशियाशी करार केला आहे आणि जपान देखील ‘हायपरसोनिक क्रूझ मिसाईल’ आणि ‘हायपर वेलोसिटी ग्लायडिंग प्रोजेक्टाइल’ विकसित करत आहे.