हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण आफ्रिकेत नवा कोरोना विषाणू आढळल्याने जगापुढे आता नवे संकट उभे राहिले आहे. यूरोपमधील कोरोना विषाणू संसर्गामुले निर्माण झालेली परिस्थिती आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात आता भारत देशातील राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही आरोग्य मंत्र्यालयाने केल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीची बैठक घेतली. यावेळी मोदींनी नव्या कोरोना व्हेरिएंटची दखल घेत राज्य सरकारला आदेश दिले. दक्षिणआफ्रिकेसह इतर देशातून भारतात विमानतळावरून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आढळलेल्या नव्या कोरोना व्हेरिएटल विषाणूबाबात माहिती घेतली. तसेच भारतात परदेशातून विमानाद्वारे येणाऱ्या प्रवाशांची कडक आरोग्य तपासणी करण्याचे आदेश भारतातील त्या त्या राज्यातील राज्य सरकारला दिले.
सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइनद्वारे बैठकीला सुरुवात झाली. यावेळी विविध आरोग्य विभागाचे विविध देशातील महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मोदींनी दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात देखील चर्चा केली. तसेच यूरोपमधील कोरोना विषाणू संसर्गामुळं निर्माण झालेली परिस्थिती आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात भारताने कोणती काळजी घ्यावी आणि उपाययोजना करावी, यासंदर्भात अधिकारी, डॉकटर यांच्याकडून मोदींनी माहिती घेतली.
कसा आहे नवा व्हेरियंट विषाणू –
व्हेरियंट विषाणू हा एक गंभीर स्वरूपाचा आहे. हा विषाणू आपल्या पासून इतर विषाणू तयार करण्यासाठी ज्या एन्झाइमची गरज असते. त्यामध्ये दोष आहे. त्यातून विषाणूचा नवीन व्हेरिएंट तयार होतो. हा नवीन विषाणू व्हेरिएंटमध्ये 50 म्युटेश आहे. स्पाइक प्रोटीनद्वारे रोगप्रतिकार शक्तीत वाढ करण्याचा प्रयत्न करतो. हा वेरिएंट लशीला दाद देईल का नाही हि शंका आहे. चाचणीतही विषाणूच्या जेनेटिक्स स्ट्रक्चरमध्ये बदल झाल्याने उपचारात बदल करावा लागणार का? हे पाहावं लागेल. उपचाराच्या पद्धतीत फार बदल करावा लागणार नाही. हा विषाणू झपाट्याने पसरत आहे.