हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अगरबत्ती उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या (KVIC) प्रस्तावित रोजगार निर्मिती कार्यक्रमास सरकारने मान्यता दिली आहे. ‘खादी अगरबत्ती आत्म-निर्भर मिशन’ नावाच्या या कार्यक्रमाचे उद्दिष्ट देशाच्या विविध भागात बेरोजगार आणि स्थलांतरित कामगारांना रोजगार निर्मिती तसेच घरगुती अगरबत्ती उत्पादनास मोठ्या प्रमाणात गती देण्याचे आहे. जर तुम्हालाही अगरबत्ती उत्पादनासाठी प्रयत्न करायचे असतील तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. आपण हा व्यवसाय कसा सुरू करावा आणि तो किती पैसे कमवून देऊ शकतो हे जाणून घेऊया.
अगरबत्ती बनवण्याची मशीन
अगरबत्ती बनवण्यासाठी बर्याच प्रकारच्या मशीनचा वापर केला जातो. यात मिक्सर मशीन, ड्रायर मशीन आणि मेन प्रॉडक्शन मशीन समाविष्ट आहेत. मिक्सिंग मशीनचा वापर हा कच्च्या मालाची पेस्ट तयार करण्यासाठी केला जातो तर मेन प्रॉडक्शन मशीन कांड्यांवर पेस्ट लावण्याचे काम करते. अगरबत्ती बनवण्याचे हे यंत्र सेमी आणि पूर्णपणे ऑटोमेटिकही असते. मशीन निवडल्यानंतर, इंस्टॉलेशनच्या बजेटनुसार मशीनच्या सप्लायरशी डील करा आणि इंस्टॉलेशन पूर्ण करा. मशीनवर काम करण्यासाठी ट्रेनिंगची देखील आवश्यकता असते.
मशीनची किंमत
भारतात अगरबत्ती बनवण्याचा खर्च 35 हजार ते 1.75 लाख रुपयांपर्यंत आहे. कमी किमतीच्या या मशीनमध्ये प्रॉडक्शन कमी असते आणि आपण त्यातून जास्त नफा मिळवणार नाही. आपण ऑटोमेटिक मशीनने अगरबत्ती बनविण्याचे काम सुरू करावे कारण ते खूप वेगाने अगरबत्ती बनवते. या ऑटोमेटिक मशीनची किंमत 90 हजार ते 1.75 लाख रुपयांपर्यंत आहे. एक ऑटोमेटिक मशीन एका दिवसात 100 किलो अगरबत्ती बनवते.
अगरबत्तीच्या कच्च्या मालाचा पुरवठा
मशीनच्या इंस्टॉलेशननंतर, कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी बाजारातील कोणत्याही चांगल्या सप्लायरशी संपर्क साधा. चांगल्या सप्लाय करणाऱ्यांची लिस्ट मिळविण्यासाठी आपण अगरबत्ती उद्योगात व्यवसाय करणार्या लोकांची मदत घेऊ शकता. कच्चा माल हा नेहमीच आवश्यकतेपेक्षा किंचित जास्त असावा कारण ते काही प्रमाणात वेस्टजमध्ये देखील जातात. अगरबत्ती बनवण्याच्या घटकांमध्ये गम पावडर, कोळशाची पावडर, बांबू, नरगिस पावडर, सुगंधी तेल, पाणी, सेंट, फुलांच्या पाकळ्या, चंदन, जिलेटिन पेपर, शॉ डस्ट, पॅकिंग मटेरियल इत्यादींचा समावेश आहे.
13 हजारमध्ये व्यवसाय सुरू होऊ शकतो
हा व्यवसाय आपण 13,000 रुपयांच्या खर्चासह व्यक्तिगतपणे बनवून सुरू करू शकता परंतु जर आपण मशीनद्वारे हा अगरबत्तीचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तो सुरू करण्यासाठी सुमारे 5 लाखांपर्यंतचा खर्च करावा लागतो. आपल्या उत्पादनास बाजारात चांगली किंमत मिळाली पाहिजे, म्हणून आपल्या उत्पादनात विशिष्टता आणण्याचा प्रयत्न करा. आपण या व्यवसायात काहीतरी नवीन केले तर आपला ब्रँड बनण्यासाठी वेळ लागणार नाही.
पॅकेजिंग आणि मार्केटिंग
आपले प्रॉडक्ट आकर्षक डिझाइन पॅकिंगवर विकल्या जाते. पॅकिंगसाठी पॅकेजिंग एक्सपर्टचा सल्ला घ्या आणि आपले पॅकेजिंग आकर्षक बनवा. पॅकेजिंगद्वारे लोकांच्या धार्मिक भावनेला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. आपण अगरबत्तीच्या मार्केटिंग साठी वृत्तपत्रे, टीव्हीमध्ये जाहिराती देऊ शकता. या व्यतिरिक्त, जर आपले बजेट जास्त असेल तर कंपनीची ऑनलाइन वेबसाइटही बनवा.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.