सुपर ओव्हर आणि न्यूझीलंडच नातं जुनंच; सर्वाधिक सामने खेळण्याचा मान, विजय मात्र एकचं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि न्युझीलंड यांच्यात झालेला तिसऱ्या टी -२० सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात भारताने न्युझीलंडचा पराभव करत मालिका आपल्या नावावर केली. मात्र, सुपर ओव्हर आणि न्यूझीलंडच नातं जुनंच आहे. गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकात सुपर ओव्हरमुळेच न्युझीलंडला स्पर्धेच्या विजयपासून वंचित राहावं लागलं होत.

त्याच गोष्टीची पुनरावृत्ती आजच्या टी -२० सामन्यात पाहायला मिळाली. वन-डे प्रमाणेच टी -२० सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभव होण्याची न्यूझीलंडची ही पहिलीच वेळ नव्हती. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडला आतापर्यंत फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे. टी-२० क्रिकेट इतिहासात आतापर्यंत १३ सामन्यांचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला आहे. यात सर्वाधिक सामने खेळण्याचा मान न्यूझीलंडने पटकावला आहे. मात्र त्याच वेळी सर्वाधिक सामने देखील त्यांनीच गामावले.

वर्ष २००८ ते २०२० या दरम्यान न्यूझीलंड संघाला पाच वेळा सुपर ओव्हरचे सामने खेळावे लागले आहेत. यापैकी २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरोधात न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये एकमेव विजय मिळवला होता. तर उर्वरीत वेस्ट इंडिज, श्रीलंका, इंग्लंड आणि भारताविरोधात खेळलेले सामने त्यांनी गमावले आहेत.

तर दुसरीकडे भारताने न्यूझीलंडविरुद्ध झालेला एकमेव टी-२० सामना आतापर्यंत सुपर ओव्हरमध्ये खेळला, आणि हा सामना जिंकून विराट कोहलीच्या नैतृत्वातील भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच टी-२० मालिका जिंकण्याचा विक्रम केला. दरम्यान, सुपर ओव्हरमधील न्यूझीलंडचा कमनशिबीपणा यांच्यातील नातं आजच्या सामन्याच्या निकालानं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

सुपरओव्हरमध्ये रोहित शर्माची कमाल ! तिसऱ्या T २० सामन्यात भारताचा रोमहर्षक विजय, मालिकाही जिंकली

डेबिट किंवा क्रेडिट कार्ड व्यवहारावरील एमडीआर शुल्क माफ होणार; अर्थसंकल्पात होऊ शकते घोषणा

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती रतन टाटांसमोर नतमस्तक; सोशलमिडीयावर कौतुकाचा वर्षाव

.

Leave a Comment