मुंबई प्रतिनिधी | विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात सध्या मतभेद असल्यानेच भारत विश्वचषक जिंकू शकला नाही. अशी चर्चा विश्वचषक सामन्यातून भारताची पीछेहाट झाल्यावर संपूर्ण क्रिकेट विश्वात रंगली होती. त्याच विराट रोहित वादावर भाष्य करण्याचा प्रयत्न विराट कोहली याने केला आहे.
आज भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना झाला. त्या आधी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत कळीच्या मुद्दयांना हात घालण्याचा प्रयत्न केला. विराट कोहलीने रोहित शर्मा आणि त्याच्या मध्ये असणाऱ्या मतभेदाच्या वृत्ताचा इन्कार केला आणि विश्वचषकात भारताने केलेल्या कामगिरीचा हवाला दिला. मात्र रोहित – कोहली वादाबद्दल कोहलीने दिलेल्या वृत्ताने क्रिकेट रसिकांची संतुष्टी झाली नाही.
विराट-रोहित वादावर कोहलीला विचारण्याचा प्रयत्न केला असता कोहली म्हणलं की , “संघात गटबाजी असती तर आम्ही वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केलीच नसती. संघ हा सांघिक खेळीच्या जोरावर सेमीफायनलपर्यंत पोहचतो. ड्रेसिंग रूममधील वातावरण अतीशय उत्तम आहे” असे म्हणून कोहलीने वादावर पडदा टाकण्याचं प्रयत्न केला परंतु क्रिक्रेटच्या जाणकारांमध्ये जायचा तो संदेश गेला आहे.