Saturday, March 25, 2023

भारत चीन तणाव: कारगिल युद्धात विजयश्री खेचून आणणाऱ्या भारतीय बोर्फार्स सीमेवर तैनात

- Advertisement -

नवी दिल्ली । भारत चीन तणावादरम्यान दोन्ही देशांकडून चर्चेच्या स्तरावर वाद सोडवण्याचा प्रयत्न सुरू असला तरी चीनकडून दगाबाजी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारतीय लष्करानं सीमेवर बोफोर्स तैनात केल्यात. एका बाजुला चर्चा सुरू असतानाच भारत चीनच्या सीमेवर दोन्ही देशांचं लष्कर आमने-सामने आल्याचं चित्रं आहे. वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) चीनकडून दगाबाजीचा धोका असल्यानं भारतीय सेनेकडून आता १५५ मिमी होवित्झर तोफा तैनात करण्यात आल्यात.

पॅन्गाँग सरोवराजवळ चिनी सेनेकडून आपली ताकद वाढवल्याचं लक्षात आल्यानंतर भारतीय लष्करानं सीमेवर बोफोर्स तोफा तैनात करण्याचं महत्त्वाचं पाऊल उचललंय. वास्तविक नियंत्रण रेषेवर सध्या जवळपास ४० हजार भारतीय जवान तैनात आहेत. वायुसेनाही सज्ज आहे त्यातच होवित्झर तोफा सीमेवर पाठवण्यात येत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, भारतीय जवानांनी फिंगर ४ पर्यंत आपलं वर्चस्व कायम केलंय. उंचीवरील जागा ताब्यात घेतल्यानं या भागात भारतीय जवानांचा दबदबा दिसून येतोय. त्यामुळे चीनची घालमेल वाढलीय. चीनकडून अगोदरच आपले जवान, गाड्या आणि हत्यारं तैनात करण्यात आलेत. भारतीय सेना चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.याआधीही चिनी सैनिकांकडून २९ – ३० ऑगस्टच्या रात्री चीनी सैनिकांनी पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील भागात घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.