Monday, January 30, 2023

भारतीय लष्कराचे Helicopter कोसळले; घटनास्थळी बचाव पथक दाखल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. अप्पर सियांग जिल्ह्यात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी पथक रवाना झालं असल्याची माहिती मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या या रुद्र हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते. याशिवाय हेलिकॉप्टरमध्ये आणखी तीन जण बसले होते.

सियांग जिल्ह्यातील टुटिंग मुख्यालयापासून 25 किमी अंतरावर असलेल्या सिंगिंग गावात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. चिंतेची बाब म्हणजे अपघात स्थळ अत्यंत दुर्गम भागात आहे. त्यामुळे बचाव कार्यात काही प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.

- Advertisement -

अरुणाचलमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही असे अपघात झाले आहेत. याच महिन्यात अरुणाचल प्रदेशातील तमांगजवळ भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं. या अपघातात ‘चित्ता’ हेलिकॉप्टरमधील पायलटचा मृत्यू झाला होता. तर दुसरा पायलट जखमी झाला होता.