भारतीय लष्कर कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यास तयार, ‘ऑपरेशन नमस्ते’ची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे भारतीय सैन्याने कंबर कसली आहे. भारतीय लष्कर कोरोना विषाणूच्या साथीवर लढण्यासाठी ‘ऑपरेशन नमस्ते’ सुरू करणार आहे. लष्करप्रमुख एमएम नरवणे यांनी स्वत: जाहीर केले आहे. देशातील कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी सैन्याने एकूण आठ क्वारंटाइन केंद्रे सुरू केली आहेत.

ऑपरेशन नमस्तेची घोषणा करताना सैन्य प्रमुख एमएम नरवणे म्हणाले की या साथीच्या विरोधात लढा देण्यासाठी सरकारला मदत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. सैन्याने भूतकाळातील सर्व ऑपरेशन्स यशस्वीरित्या पार पाडली आहेत आणि ऑपरेशन नमस्तेही यशस्वीरित्या पार पाडले जाईल.

लष्करप्रमुख म्हणाले की कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात सरकार आणि नागरिकांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. सेनापती म्हणून माझे जवान सुरक्षित आणि तंदुरुस्त राहणे माझे प्राधान्य आहे.आपली कर्तव्ये आपण तेव्हाच पार पाडू शकतो जेव्हा आपण स्वतः सुरक्षित असू.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

इस्लामपूरात एकाच कुटुंबातील २३ जणांना कोरोनाची लागण कशी झाली? घ्या जाणून

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तुमचे नाव आहे का? ‘इथे’ करा चेक, वर्षाला मिळतात ६ हजार रुपये!

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली १४७ वर; तुमच्या जिल्ह्यात किती?

महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”

भारतात या ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

Leave a Comment