नवरदेवाचा अतिउत्साह मित्राच्या जीवावर बेतला, लग्नाच्या वरातीत झाला मृत्यू

0
175
Firing
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था – लग्न म्हटलं त्याचा आनंद, उत्साह सर्वांनाच असतो. काही लोकांचा हा उत्साह अतिउत्साहात बदलतो आणि त्यानंतर ते काय करतील याचा काही नेम नाही. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. यामध्ये एका नवरदेवाचा अतिउत्साह त्याच्या जवान मित्राच्या जीवावर बेतला (Firing) आहे. नवरदेवाच्या एका चुकीमुळे लग्नाच्या वरातीत त्याच्या जवान मित्राचा मृत्यू झाला आहे.

हि घटना उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यातील महुआरी या ठिकाणी घडली आहे. आर्मीत जवान असलेला बाबूलाल यादव काश्मीरमध्ये कार्यरत होता. काही दिवसांपूर्वीच सुट्टी मिळाल्यानंतर तो यूपीच्या सोनभद्र जिल्ह्यातील महुआरी या आपल्या गावी आला होता. तिथं तो आपला मित्र मनीष मद्धेशियाच्या लग्नाला गेला. नवरदेवाची वरात निघाली होती. नवरदेव घोड्यावर बसला होता. तिथं जवळच बाबूलाही खाली उभा होता. घोड्यावर बसलेल्या नवरदेवाने उत्साहात बंदुकीतून हवेत गोळी (Firing) झाडली. पण हीच गोळी बाबूलालला बसली (Firing) आणि तो जमिनीवर कोसळला.

गोळी लागताच बाबूलालला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला चेक करून मृत घोषित केले. मृत बाबुलाल यादवच्या कुटुंबाच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत आरोपी नवरदेव मनीषला अटक करण्यात आली आहे. त्याने ज्या बंदुकीतून गोळी झाडली (Firing) ती बंदूक जप्त करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
आई-वडिलांच्या प्रेमाची मुलीला मिळाली शिक्षा, नेमके काय घडले ?

सरकारकडून लवकरच ट्रान्सफर केले जाणार PF वरील व्याजाचे पैसे !!!

गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ; राऊतांचे ट्विटद्वारे बंडखोर आमदारांना आवाहन

Cheteshwar Pujara ने भारतीय संघातील पुनरागमनाचे श्रेय रणजी ट्रॉफी-कौंटी क्रिकेटला दिले

अजित पवार कॉंग्रेस आमदारांनाही त्रास देत होते- नाना पटोले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here