गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ; राऊतांचे ट्विटद्वारे बंडखोर आमदारांना आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतरही आता महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना शेवटचे आवाहन केले आहे. “चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत.. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ !” असे ट्विट राऊत यांनी केले आहे.

आज शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक पार पडली. यावेळी संजय राऊत यांनी सुरुवातीला माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी”बाहेर असलेल्या शिवसेना आमदारांना जर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि वेगळा विचार करावा असे वाटत असेल तर तोदेखील विचार करू. मात्र, तुम्ही आधी 24 तासात मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी. मुंबईत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करावी, असे सांगितले होते. त्यानंतर आता पुन्हा राऊतांनी ट्विट केले आहे.

राऊत यांनी आपल्या ट्विटमधून भाजपवर एक प्रकारे निशाणंच साधला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे की, चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ ! जय महाराष्ट्र !, असे म्हणत बंडखोर आमदारांना आवाहन केले असून भाजपवर निशाना साधला आहे.

Leave a Comment