नवी दिल्ली | अवंतिपोरमध्ये भारतीय सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमुळे सुरु असणाऱ्या चकमकीमध्ये भारताने 12 लाखांचे इनाम असणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यामुळं भारतीय सैन्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिज्बुल मुजाहिद्दीन या दशतवादी संघटनेचा महत्वाचा कंमांडर रियाज नायकू या चकमकीमध्ये ठार झाला आहे. अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
दरम्यान भारतीय लष्कराने रियाजला पकडून देणाऱ्याला १२ लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे हा एक मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर हिज्बुल मुजाहिद्दीनने रियाजची कमांडर म्हणून निवड केली होती. मात्र भारतीय लष्कराने त्याचा खात्मा करून हे 12 लाखाचे इनाम जिंकले आहे.
रियाज हा सोशल मिडियाच्या माध्यमातून तरुणांची माथी भडकवून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करुन घेत असे. सुरक्षा दलांनी रियाजचा समावेश ए प्लस प्लस कॅटेगरीच्या दहशतवादींच्या यादीमध्ये केला होता. म्हणजेच रियाज हा सर्वात धोकायदाक आणि सक्रीय दहशतवाद्यांपैकी एक होता. मात्र भारतीय सैन्याने मोठ्या शिताफीने त्याचा नुकताच खात्मा केला आहे.