हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Bank : जर आपल्याला स्वस्तात घर किंवा मालमत्ता खरेदी करायची असेल तर आपल्यासाठी एक चांगली संधी चालून आली आहे. वास्तविक इंडियन बँकेकडून मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. यामध्ये रेसिडेन्शिअल, कमर्शिअल, इंडस्ट्रियल सारख्या मालमत्तांचा समावेश असेल. यामुळे कमी पैशांत आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येऊ शकेल. हे लक्षात घ्या कि, या अशा मालमत्ता आहेत ज्या डिफॉल्टच्या लिस्टमध्ये आल्या आहेत. याबाबतची माहिती IBAPI (Indian Banks Auctions Morgaged Properties Information) कडून देण्यात आली आहे.
ज्या मालमत्तांच्या मालकांनी त्यांच्या कर्जाची परतफेड केलेली नाही किंवा काही कारणास्तव ते देऊ शकलेले नाहीत, त्या सर्व लोकांच्या जमिनी बँकांकडून ताब्यात घेतल्या जातात. अशा मालमत्तांचा बँकांकडून वेळोवेळी लिलाव केला जातो. या लिलावात मालमत्ता विकून बँका आपली थकबाकी वसूल करते. Indian Bank
Your Dream Property is a few bids away!
Participate in the Indian Bank Mega Properties
E-Auction on 15th & 16th November, 2022 for options.https://t.co/ofsymNqYDK#IndianBank #AmritMahotsav#dfsindiacelebratesamritmahotsav pic.twitter.com/5hc1pRTVLv— Indian Bank (@MyIndianBank) November 9, 2022
Indian Bank ने ट्विट करत दिली माहिती
आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत बँकेने याबाबतची माहिती दिली आहे. बँकेने या ट्विटमध्ये लिहिले की, रेसिडेन्शिअल आणि कमर्शिअल मालमत्तांचा ई-लिलाव 15 आणि 16 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. येथे आपल्याला वाजवी किंमतीत मालमत्ता खरेदी करता येतील.
अधिक माहितीसाठी ‘या’ लिंकवर क्लिक करा
मालमत्तांच्या लिलावाच्या अधिक माहितीसाठी https://ibapi.in/Sale_Info_Home_ib.aspx या लिंकला भेट द्या.
Indian Bank च्या म्हणण्यानुसार, लिलावासाठी जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये मालमत्तांचे फ्रीहोल्ड किंवा लीजहोल्ड, लोकेशन, मोजमाप आणि इतर माहिती देखील देण्यात आली आहे. जर आपल्याला ई-ऑक्शनद्वारे मालमत्ता खरेदी करायची असेल तर त्यासाठी बँकेत जाऊन यासंबंधित मालमत्तेची कोणतीही माहिती मिळवता येईल.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा