“राम सेतूला राष्ट्रीय वारसा घोषित न केल्यास…” खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा सरकारला घरचा आहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ‘राम सेतू’ (Ram Setu) राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी प्रयत्न करत आहेत. यावरून आता सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. जर “मोदी सरकारने राम सेतूला (Ram Setu) वारसा स्थळ घोषित न केल्यास 2024 मधील लोकसभा निवडणुकीत एकतर भाजपाचा पराभव होईल किंवा हिंदूत्ववादी शक्ती मोदींना पदावरुन दूर करतील”, असे ट्विट भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. एवढेच नाहीतर राम सेतूबाबत हिंदूत्ववाद्यांनी पंतप्रधान मोदींना अल्टिमेटम दिले पाहिजे असेदेखील सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत.

‘राम सेतू’च्या (Ram Setu) मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात 16 वेळा सुनावणी पार पडली आहे. केंद्र सरकारने या मुद्द्यासंदर्भात ठोस पावले उचलले नसल्याचा आरोप यावेळी सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडून करण्यात आला आहे. ‘राम सेतू’ (Ram Setu) हा आदमचा पूल म्हणूनही ओळखला जातो. रामेश्वरमपासून श्रीलंकेच्या वायव्य समुद्रतटापर्यंत 48 किलोमीटरचा हा चुनखडीचा पूल आहे.

हिंदू तसेच मुस्लिम संस्कृतीमध्ये या पूलाचं महत्त्व खूप आहे. हिंदूंची अशी मान्यता आहे की प्रभू श्रीराम यांनी रावणाचा वध करण्यासाठी लंकेत जाण्यासाठी वानरसेनेला हाताशी धरून हा पूल (Ram Setu) बांधला होता. तर मुस्लीम लोकांची अशी मान्यता आहे की आदमने हा पूल पार केला आणि लंकेतल्या एका शिखरावर प्रायश्चित्त म्हणून तो 1000 वर्षे एका पायावर उभा होता.

हे पण वाचा :
‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली
IRCTC च्या वेबसाईटद्वारे अशा प्रकारे बुक करा तिकिटे
Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?