हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. दौऱ्यावरील आपला पहिलाच सामना खेळणारा रोहित शर्मा याने शुबमन गिलसोबत ७० धावांची दमदार भागीदारी केली. रोहितने ७७ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार लगावत २६ धावा केल्या. डावाच्या १६व्या षटकात रोहित शर्माने नाथन लायनच्या गोलंदाजीवर पुढे येऊन सरळ रेषेत उत्तुंग षटकार लगावला.
या षटकारासह त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध १०० षटकार पूर्ण केले. टी२०, वन डे आणि कसोटी असे तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून ऑस्ट्रेलियाविरूद्ध १०० षटकार ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला.
International six No.424 for Rohit Sharma!
Live #AUSvIND: https://t.co/xdDaedY10F pic.twitter.com/nypB41kYvB
— cricket.com.au (@cricketcomau) January 8, 2021
रोहितने ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना वन डे मध्ये ६३ षटकार ठोकले आहेत. ऑस्ट्रेलियाविरूद्ध वन डे मध्ये इतके षटकार इतर कोणत्याही खेळाडूने मारलेले नाहीत. आज कसोटीतील षटकार मारत रोहितने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ४२४वा षटकार लगावला. सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्याएवढे षटकार कोणत्याही खेळाडूच्या नावे जमा नाहीत.
दरम्यान प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 338 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ ने झुंजार शतक लगावल. तर भारताकडुन फिरकीपटू रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4 बळी घेतले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’