SBI आणि IOCL ने लॉन्च केले कॉन्टॅक्टलेस रुपे डेबिट कार्ड, कोणाला जास्त लाभ मिळणार ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर आपण पेट्रोल-डिझेल खरेदी करण्यात दरमहा जास्त खर्च करत असाल तर ही बातमी आपल्यासाठीच आहे. आता बाजारात एक नवीन डेबिट कार्ड (Debit Card) आणले गेले आहे, जे तुमची बचत वाढवण्यात उपयुक्त ठरेल. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) ने संयुक्तपणे को-ब्रँडेड कॉन्टॅक्टलेस रूपे डेबिट कार्ड लॉन्च केल्याची घोषणा केली आहे.

https://t.co/gKmkOyG5X4?amp=1

हे कार्ड संपूर्ण देशात सुरू करण्यात आले आहे. याद्वारे इंडियन ऑईल स्टेशनवर 200 रुपये खर्च केल्यानंतर ग्राहकांना 6 पट रिवॉर्ड पॉइंट्स आणि 0.75 टक्के लॉयल्टी पॉइंट्स मिळतील.

https://t.co/eDn0QHWpiM?amp=1

ग्राहक डायनिंग, मुव्ही, ग्रोसरी आणि युटिलिटी बिल्सच्या खर्चावर रिवॉर्ड पॉइंट्सची कमाई करु शकतात तसेच ते रीडीमही करू शकतात. इंधन खरेदी करण्यासाठी कोणतेही मंथली लिमिट नाही. हे डेबिट कार्ड भारतात कोठेही दिले जाऊ शकते. आपण एसबीआयच्या होम बरंच मध्ये जाऊन या कार्डसाठी अर्ज करू शकता.

https://t.co/f7wcBX2AAI?amp=1

टॅपद्वारे शक्य 5 हजार रुपयांचे पेमेंट शक्य
आरबीआयने नुकतीच यावर्षी टॅप अँड गो फीचर अंतर्गत 5000 रुपयांपर्यंतचे पेमेंट देण्यास मान्यता दिल्यानंतर कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर एसबीआय-आयओसीएल कॉन्टॅक्टलेस रुपे डेबिट कार्डच्या माध्यमातून ‘टॅप अँड गो’ तंत्रज्ञानाद्वारे 5 हजार रुपयांपर्यंतचे पेमेंट देखील केले जाऊ शकते.

https://t.co/9KqfbJx5MY?amp=1

एसबीआयचे अध्यक्ष दिनेशकुमार खारा म्हणाले,”या को-ब्रांडेड कार्डवर ‘टॅप अँड पे’ तंत्रज्ञानासह अनेक आकर्षक ऑफर्सही मिळतील. या कार्डधारकांना केवळ इंधन खरेदीच्या रिवार्डिंगचाच अनुभव मिळणार नाही तर याद्वारे ग्राहकांच्या रोजच्या खरेदीसही सुरक्षितपणे सुलभ केले जाईल.

https://t.co/O5ISa03g8S?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment