मी विकेटकिपर का झालो? Rishabh Pant ने सांगितला ‘तो’ रंजक किस्सा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडिया 9 जूनपासून दक्षिण आफ्रिकेशी टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली या दोघांनाही विश्रांती देण्यात आली आहे. आगामी मालिका आणि टी-20 वर्ल्ड कप असा व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे त्या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेसाठी लोकेश राहुलला संघाचे कर्णधारपद देण्यात आले तर रिषभ पंतकडे (Rishabh Pant) टीमचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. रिषभ पंत (Rishabh Pant) संघात विकेटकिपर-फलंदाज म्हणून समाविष्ट झाला होता. पण सुरूवातीला तो केवळ फलंदाजीसाठी ओळखला जायचा. नंतर त्याने आपल्या कामगिरीत सुधारण करत उत्तम यष्टीरक्षक म्हणून नाव कमावले. पण त्याने यष्टीरक्षक होण्याचा निर्णय कसा घेतला, याबद्दल रिषभ पंतने (Rishabh Pant) एक रंजक किस्सा सांगितला आहे.

काय आहे तो किस्सा ?
रिषभ पंत म्हणाला कि, “माझी विकेटकिपिंग सुधारली आहे की नाही याबद्दल मी काहीही बोलणार नाही. कारण मी तसं बोलणं योग्य नाही. ती गोष्ट चाहत्यांनाच ठरवू दे. मी केवळ प्रयत्न करतो आहे. मी प्रत्येक सामन्यात माझ्याकडून 100 टक्के उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. मी कायमच विकेटकिपर-फलंदाज म्हणून संघात होतो. पण मी लहानपणापासूनच किपिंग करायचो. मी विकेटकिपर का झालो असं मला अनेकदा विचारलं जातं. त्याचं कारण म्हणजे माझे वडिल विकेटकिपर होते. त्यांच्यासोबत खेळताना मी देखील विकेटकिपर झालो. माझ्या वडिलांना पाहून माझा विकेटकिपर हा प्रवास सुरू झाला” असे सांगितले.

तसेच “तुम्हाला चांगला विकेटकिपर व्हायचे असेल तर तुम्ही स्वतःला चपळ ठेवायला हवे. जर तुम्ही पुरेसे चपळ असाल तर तुम्ही सर्वोत्तम कामगिरी करू शकाल. दुसरी गोष्ट म्हणजे चेंडू शेवटपर्यंत पाहणे महत्त्वाचे असते. कधीकधी असे होते की चेंडू तुमच्या दिशेने येतोय हे आम्हाला माहित असते, त्यामुळे आम्ही रिलॅक्स राहतो, पण जोपर्यंत चेंडू पकडला जात नाही, तोपर्यंत चेंडूवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं असतं. कारण शिस्तबद्ध आणि तंत्रशुद्ध कामगिरी करणं हेच सर्वात महत्त्वाचे असते”,असेदेखील रिषभ पंतने (Rishabh Pant) सांगितले आहे.

हे पण वाचा :
महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत शरद पवारांनी केले ‘हे’ आवाहन; म्हणाले…

पैगंबर वादाचे पडसाद; अल- कायदाची मुंबई- दिल्लीत आत्मघातकी हल्ल्याची धमकी

खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला चिमुकला; जवानांनी वाचवला जीव

‘जय शिवाजी’, ‘हरहर महादेव’ म्हणत कोल्हापूरच्या 80 वर्षांच्या आजीने सर केला रायगड

Sarfaraz Khan ने रचला इतिहास, ब्रॅडमननंतर ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू

Leave a Comment